इम्रान हाश्मीसारखा सेम टू सेम ! फरक ओळखून तर दाखवा

बॉलिवूडची भुरळ केवळ भारतीयांना नव्हे तर जगभरातील रसिकांना पडते.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 29, 2018, 01:43 PM IST
इम्रान हाश्मीसारखा सेम टू सेम ! फरक ओळखून तर दाखवा  title=

पाकिस्तान : बॉलिवूडची भुरळ केवळ भारतीयांना नव्हे तर जगभरातील रसिकांना पडते. भारत - पाकिस्तान फाळणीनंतर वेगळे झाले  असले तरी पाकिस्तानमध्ये आजही क्रिकेटर्स  आणि सेलिब्रिटींची क्रेझ आहे.  

इम्रान हश्मीसारखा सेम टू सेम 

मजदाक खान हा पाकिस्तानी नागरिक इम्रान हाश्मीसारखा दिसतो. सोबतच तो इम्रानचा चाहताही आहे. मजदाकने इम्रानप्रमाणेच त्याची स्टाईल फॉलो केली आहे. सोशल मीडियावर मजदाकचे फोटो झपाट्याने शेअर होत आहेत. 

अभिनेता होण्याचं स्वप्न 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मजदाकला भविष्यात अभिनयामध्ये करियर करण्याची इच्छा आहे. लवकरच तो मॉडलिंग करणार आहे. सोशल मीडियावर मजदाक खूप अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याच्या फोटोंवर अनेकांनी तो इम्रानचा ड्युप्लिकेट असल्याचे सांगितले आहे.  

रातोरात स्टार  

मजदाकने दिलेल्या माहितीनुसार, केवळ इम्रानप्रमाणे दिसत असल्याने मी रातोरात स्टार झालो आहे. अनेकजण मला भेटल्यावर माझ्यासोबत सेल्फी क्लिक करतात.  

भारताप्रमाणे मजदाकची क्रेझ ही बॉलिवूडचे जगभरात जेथे चाहते आहेत तेथे सार्‍याच ठिकाणी आहे.  

फरक ओळखणं कठीण  

मजदाक आणि इम्रान हाश्मी यांच्यामध्ये इतके साम्य आहे की त्यांच्यामध्ये फरक ओळखणं हे पहिल्यादां फोटो पाहणार्‍यांसाठी थक्क करणारे आहे. त्यांच्यामधील फरक ओळखणं कठीण आहे. इम्रान हाश्मीलाही या फॅनचं कौतुक आहे.