मुंबई : लग्न झालेला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह सध्या पत्नी मदालसासोबत कॅलिफोर्नियामध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. मदालसाने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचे फोटोज शेअर केले आहेत. फोटो शेअर करत मदालसाने लिहिले की, जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिले होते, तेव्हाच वाटले की हाच आहे तो... आणि आता तुझी बायको होवून मी खूप आनंदात आहे.
मिमोह १० जुलैला साऊथ इंडियन अभिनेत्री मदालसा शर्मासोबत विवाहबद्ध झाला. मिथुन यांच्या उटी येथील हॉटेलमध्ये हिंदू परंपरेनुसार हा विवाहसोहळा पार पडला. त्यापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते.
या दोघांचे लग्न ७ जुलैला होणार होते. पण त्यापूर्वीच एका भोजपूरी अभिनेत्रीने मिमोहवर बलात्कार आणि बळजबरी अबॉर्शन केल्याचे आरोप लावले. त्याचबरोबर मिमोहच्या आईवर धमकवण्याचे आरोपही तिने केले होते. याबद्दल त्या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र तेथे कारवाई न झाल्याने तिने दिल्लीच्या न्यायालयाचे दार ठोठावले. मिथुनची पत्नी योगिता बाली आणि मुलावर जबरदस्ती गर्भपाताचा आरोप
कोर्टाने पोलिसांना मिमोह आणि त्याच्या आई विरुद्ध एफआरआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मिमोहने मुंबई हायकोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला मात्र तो रद्द झाला. पण दिल्लीच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला. त्यानंतर मिमोह आणि मदालसा यांचे कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न झाले. बलात्काराच्या आरोपानंतर मिथुनच्या मुलाची 'चट मंगनी पट शादी'