Masaba Gupta Trolling : वेडिंग पार्टीत घातला 'स्विमिंग कॉस्च्युम', मसाबा गुप्ता ट्रोलिंगची शिकार

मसाबा गुप्ताच्या लग्नाच्या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहेत. 

Updated: Jan 28, 2023, 05:26 PM IST
Masaba Gupta Trolling : वेडिंग पार्टीत घातला 'स्विमिंग कॉस्च्युम', मसाबा गुप्ता ट्रोलिंगची शिकार title=

Masaba Gupta Trolling : वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांची लाडकी मुलगी नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ताने 27 जानेवारी 2023 रोजी दुसरं लग्न केलं. आयुष्यात पुढे जाताना मसाबाने तिचा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत सात फेरे घेतले आहेत.   यावेळी फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सामील होते. लग्नानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र पार्टी करतानाचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून युजर्सनी मसाबावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Masaba Gupta Trolling
मसाबा गुप्ताच्या लग्नाच्या सेलिब्रेशन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहेत. मात्र, त्यात मसाबा गुप्ताचा आउटफिट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्राच्या लग्नाच्या पार्टीत मसाबाची आई नीना गुप्ता आणि वडील विवियन रिचर्ड्स देखील दिसले होते. मसाबा तिच्या वडिलांसोबत पार्टीत ग्रँड एन्ट्री करताना दिसली. दरम्यान, सोशल मीडिया यूजर्स मसाबाच्या ड्रेसिंग सेन्सची शिल्ली उडवली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली  

मसाबा गुप्ताच्या ड्रेसची खिल्ली 
मसाबा गुप्ताचा पोशाख पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'तिच्या आउटफिटमुळे मी खूप गोंधळलो आहे.'  तरदुसऱ्याने लिहिलं आहे की, 'डिझायनर असल्याने, जर ती स्वत:साठी चांगले कपडे डिझाइन करू शकत नसेल, तर ती डिझायनर कसली?' अशाच प्रकारच्या अजून कमेंट या व्हिडिओवर युजर्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Masaba Gupta Satyadeep Misra चं दुसरं लग्न
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांची भेट 'मसाबा मसाबा' या वेब शोच्या सेटवर झाली होती. तिथून त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतप प्रेमात झालं. आणि आता हे जोडपे लग्न करून एकमेकांचे बनले आहेत. माहितीसाठी, मसाबा गुप्ताचं पहिलं लग्न फिल्ममेकर मधु मंटेनासोबत झालं होतं. मात्र, लग्नाच्या पाच वर्षांनंतर 2020 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सत्यदीप मिश्रा यांचंही हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न आदिती राव हैदरी हिच्याशी झालं होतं. पण 2013 मध्ये आदिती आणि सत्यदीपने घटस्फोट घेतला.