विवाहित महिलांनी चुकूनही 'या' दिशेला झोपू नये, नाहीतर होईल मोठं नुकसान

तुमचं लग्न झालं असेल तर 'या' दिशेला झोपताना विचार करा... अविवाहित मुलींच्या झोपण्यासाठी ही दिशा योग्य...   

Updated: Mar 20, 2022, 05:44 PM IST
विवाहित महिलांनी चुकूनही 'या' दिशेला झोपू नये, नाहीतर होईल मोठं नुकसान title=

मुंबई : वास्तू शास्त्रात घराच्या प्रत्येक दिशेला वेगळं महत्त्व असतं. त्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी कोणती दिशा योग्य आहे, या सर्व गोष्टींची नोंद वास्तू शास्त्रात केली आहे. वास्तूनुसार उत्तर-पश्चिम दिशा दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सामर्थ्य देते. घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला दोष असेल तर मित्रही शत्रू होतात. यासोबतचं उर्जा कमी होऊन वय कमी होते. 

- वास्तू शास्त्रानुसार विवाहित महिलांनी उत्तर-पश्चिम म्हणजे वायव्य दिशेला झोपलं पाहिजे. ज्यामुळे वैवाहिक आयुष्यात असलेले समस्या कमी होतात. तर उत्तर-पश्चिम दिशेला अविवाहित मुलींनी झोपायला हवं. ज्यामुळे त्यांच्या जीवनात विवाहाचे योग येतात. 

- वास्तूनुसार मुलांच्या आभ्यासाची जागा ईशान्य, उत्तर किंवा वायव्या दिशेने असणं शुभ मानलं जातं. त्याचंप्रमाणे पुस्तकांचं कपाट पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असायला हवं..

- वास्तूनुसार उत्तर-पश्चिम दिशेकडील दोष दूर करण्यासाठी घरात एक्वेरियम किंवा छोटं कारंज लावावा. ज्यामध्ये 6 रंगीत मासे आणि एक काळ्या रंगाचा मासा ठेवावा. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)