Swapnil Mayekar Death: गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आपल्याला अनेक दुःखद बातम्या मिळाल्या आहेत. कधी कोणी आत्महत्या करत तर कधी कोणाचा अचानक मृत्यू होतोय. आता मराठी चित्रपटसृष्टीतून अशीच एक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय दिग्दर्शक आणि लेखक स्वप्नील मयेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 46 व्या वर्षी स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्याना या गोष्टीनं हादरवून सोडलं आहे की उद्या म्हणजे 5 मे रोजी त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि आज 4 मे रोजी त्यानं अखेरचा श्वास घेतला. स्वप्नीलच्या या चित्रपटाचं नाव 'मराठी पाऊल पडते पुढे' असे होते. रिपोर्ट्सनुसार, स्वप्नील हा गेल्या अनेक दिवसांपासून आजरी होता. स्वप्नीलच्या कुटुंबाविषयी बोलायचे झाले तर त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत.
स्वप्नीलनं आज सकाळी पहाटे चेंबूर घाटलागाव इथं राबत्या घरी निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. त्याला 1 मे पासून उलट्या जुलाबाचा (गॅस्ट्रो) त्रास सुरू झाला होता. काल रात्री त्याला खूप त्रास होऊ लागला होता. हे पाहता त्याला चेंबुरच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज सकाळी त्याची प्राणज्योत मालावली. त्याच्यावर आज चेंबूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
स्वप्नील मयेकरचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून आज अचानक ही बातमी समोर आल्यानं त्याच्या टीमला आणि चाहत्यांना धक्कबसला आहे. त्याच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलच्या या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, आणि संजय कुलकर्णी या कलाकारांच्या भूमिका आहेत. आता स्वप्नीलच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याच्या चित्रीकरणाच्या वेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...
दरम्यान, दिग्दर्शक म्हणून हा स्वप्नील मयेकरचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात असलेलं 'हाऊ पोऱ्या अनेर काठणा' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. स्वप्नीलनं ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तर याशिवाय 'हम है धर्मयोद्धा' या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यानं केलं होतं. इतकंच नाही तर अनेक मराठी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.