Piyush Ranade Wedding Suruchi Adarkar : 'का रे दुरावा' आणि 'अंजली' सारख्या मालिकांमधून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर विवाहबंधनात अडकली आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे अभिनेत्री सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्याही चाहत्यांसाठी ही मोठी आणि आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे. पियुष आणि सुरुचीने 'अंजली' या मालिकेत एकत्र काम केलं आहे.
सुरुची आणि पियुष या अगोदर कधीच एकत्र दिसले नाही किंवा दोघांनी एकमेकांचे कधी फोटो शेअर केले नाहीत. त्यामुळे याबाबत कुणालाही कल्पना नसताना थेट लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यानंतर आता पियुष आणि सुरुचीच्या लग्नाची आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोघांनी गोड फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सुरुची अडारकरने खास पोस्ट शेअर केली यामध्ये.. आनंदाचा दिवस... Happiest Day असं म्हणतं... #PSILoveYou आणि हार्ट इमोजी टाकून आनंद व्यक्त केला आहे.
आतापर्यंत सुरुचीने कधीच पियुषसोबत एकही फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळे चाहत्यांसाठी हा गोड धक्का आहे. तसेच या फोटोवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पियष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. या अगोदर पियुषने अभिनेत्री मयुरी वाघसोबत दुसरं लग्न केलं होतं. तर पियुषचे पहिले लग्न अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत झालं होतं. पण या दोघींसोबतच काही वर्षातच घटस्फोट झाला. 'दुर्वा' या मालिकेत शाल्मली टोळ्येने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच शाल्मली 'चुपके चुपके' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मयुरी वाघसोबत पियुषचं दुसरं लग्न होतं. 1 फेब्रुवारी 2016 रोजी मयुरीसोबत दुसरं लग्न केलं होतं. पण काही वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला.