मुंबई : प्रसिद्ध मालिका 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणजेच अंगूरी भाभी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. स्पॉटब्वॉयच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्री आयसेलेट झाली आहे आणि काळजी घेत आहे. शुभांगी अत्रे हिला काही सौम्य लक्षणं होती. त्यानंतर तिने कोरोना टेस्ट केली होती.
शुभांगी अत्रे सध्या घरीच क्वारंटाईन आहे. शुभांगी अत्रेच्या आधी अनेक स्टार्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत अनेक टीव्ही स्टार्स आणि बॉलिवूड स्टार्स यांना कोरोनाची लागण झाली आहे.
टीव्ही अभिनेत्री रूपा गांगुली, आशीष महरोत्रा, मोनालिसा, सुधांशू पांडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बॉलिवूडमध्ये ही यादी खूपच मोठी आहे. ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता अक्षय कुमार, विक्की कौशल, भूमी पेडनेकर, गोविंदा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे.
रणबीर कपूर, आमिर ख़ान, मनोज बाजपेयी, आर माधवन, मिलिंद सोमन, सतीश कौशिक, संजय लीला भंसाली, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.