मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा कायम त्याच्या विनोदबुद्धीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो 'द कपिल शर्मा शो' मुळे चर्चेत आहे. तर दुसऱ्यांदा वडील झालेल्या कपिलने त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं आहे? असा प्रश्न वारंवार चाहते त्याला विचारत असतात. फेब्रुवारी महिन्यात कपिलच्या घरी नव्या पाहूण्यातं आगमन झालं. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली आहे. गिन्नी आणि कपिलने त्यांच्या मुलाचं जे नाव ठेवलं आहे. ते अत्यंत सुंदर आहे.
कसं आलं कपिलच्या मुलाचं नाव समोर
कपिलने आतापर्यंत त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. शिवाय मुलाच्या नावाची घोषा देखील त्याने केली नाही. पण गायक नीती मोहनने जेव्हा कपिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, कपिलला त्याच्या मुलाचं नीव विचारलं. नीतिने मुलाचं नाव विचारल्यानंतर कपिलने त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणी केली.
नीति ट्विट करत म्हणाली, 'हॅप्पी बर्थडे कपिल पाजी.. तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रेम... तुझ्या मुलाचं नाव सांग..' यावर कपिल म्हणाला, 'धन्यवाद नीतू.. स्वतःची काळजी घे. आम्ही मुलाचं नाव त्रिशान ठेवलं आहे...' असं म्हणतं कपिलने त्याच्या मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे.
त्रिशान नावाचा अर्थ
खरचं कपिलने त्याच्या मुलाचं नाव खूप वेगळं ठेवलं आहे. त्रिशान नावाचे दोन अर्थ आहेत. त्रिशान नावाचा पहिला अर्थ म्हणजे आनंदाचा राजा आणि दुसरा अर्थ म्हणजे विजय असा आहे.