मानुषीने छिल्लरने राहुल गांधींना दिलं उत्तर

मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड २०१७ चा किताब आपल्या नावे करून घेतला. आणि 

Updated: Nov 20, 2017, 06:35 PM IST
मानुषीने छिल्लरने राहुल गांधींना दिलं उत्तर  title=

नवी दिल्ली : मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड २०१७ चा किताब आपल्या नावे करून घेतला. आणि 

 गेले दोन दिवस मानुषी चर्चेत असून अनेकांनी मानुषी छिल्लर हिला शुभेच्छा दिल्या. मानुषीला भारताच्या पंतप्रधानांपासून ते अगदी सर्व मान्यवरांनी कौतुक केलं. यावेळी शशी थरूर यांनी मानुषीची ट्विटरवर केलेली थट्टा अधिक चर्चेत आली. थरूर यांनी मानुषी छिल्लरला 'चिल्लर' असं संबोधलं. यावर मानुषीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं देखील. 

यामध्येच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मानुषीला शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल यांनी ट्विट करताना म्हटले की, मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लरला तिने जिंकलेल्या या किताबा करता भरपूर साऱ्या शुभेच्छा. 
आपल्या देशातील युवा आपल्याला गर्व होईल अशा गोष्टी करतात. 

यावर मनुषीने ट्विट करत राहुल गांधींचे आभार मानले आणि म्हटलं की, मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना भरपूर आनंद झाला. यासोबतच मानुषीने राष्ट्रपती कोविंद यांचे देखील आभार मानले.