काय म्हणता! मनोज बाजपेयीचा 8 पॅक अ‍ॅब्सचा फोटो बनावट होता? अभिनेत्याने केला खुलासा

'किलर सूप'मुळे गेले अनेक दिवस अभिनेता मनोज बाजपेयी चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनोज बाजपेयीचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. मात्र आता अभिनेत्याने हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे.

Updated: Jan 17, 2024, 04:32 PM IST
काय म्हणता! मनोज बाजपेयीचा 8 पॅक अ‍ॅब्सचा फोटो बनावट होता? अभिनेत्याने केला खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी या दिवसांत त्याची आगामी सिरीज 'किलर सूप'मुळे चर्चेत आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने चर्चेत असणारा मनोज बाजपेयी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नविन वर्षाचं औचित्य साधून मनोज बाजपेयीने त्याच्या इन्साग्रामवर त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो शेअर केला होता. त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने अशी बॉडी कशी बनवली असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचा हा लूक पाहिल्यानंतर अनेक स्टार त्याच्या समोर फिके पडतात.  शेअर केलेल्या या फोटोत तो अॅब्स फ्लॉन्ट करतानान दिसत आहे. मनोज बाजपेयीने नवीन वर्षानिमित्त शेअर केलेल्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.
 
नवीन वर्षाचं औचित्य साधून मनोज बाजपेयीने स्वत:चा शर्टलेस फोटो शेअर करुन सोशल मीडियावर आग लावली होती. त्याचा हा बोल्ड अंदाज पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. मात्र समोर आलेला हा फोटो खोटा असल्याचा खुलासा स्वत: अभिनेत्याने केला आहे. 

मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन दोघंही या दिवसांत कॉमेडी क्राईम थ्रिलर रिलीजमुळे चर्चेत आहेत. ११ जानेवारीला नेटफ्लिक्सवर याचा प्रिमियर झाला आहे. ज्याला लोकं खूप पसंती देत आहेत. या सिरीजच्या प्रमोशनला सुरु करण्याआधीच अभिनेत्याने एक नवा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो 8 पॅक्ससह शर्टलेस दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'नवीन वर्ष नवीन मी' पहा delicious सूपचा माझ्या बॉडीवर काय परिणाम. एकदम किलर लूक आहे ना.''

सिरीजच्या प्रीमियरनंतर आता अभिनेत्याने त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या फोटोवरुन पडता उचलला आहे.   इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्याला या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनविषयी प्रश्न विचारण्यात आला. या विषयावर बोलताान अभिनेता म्हणाला, हा नेटफ्लिक्सचा प्रमोशन फंडा होता त्यामुळे यासाठी कट कारस्थानसहित  या अभियानाला ते एका उंचीच्या शिखरावर पोहचवायला सुरुवात करु ईच्छित होते  आणि असं करण्यात ते यशस्वीदेखील झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 अनेकांनी त्याच्या या फोटोवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं होतं. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं की, ''हे भगवान हा सुपर सेक्सी आहे मनोज. मला खूप आवडलं.''सिनेमा  लेखक अपूर्व इसरानीने कमेंट करत लिहीलं आहे की, ''खूपच प्रभावशाली, कृपया इस प्यास का जाल मुझ पर छोड दो.'' तर सिने निर्माता अनुराग कश्यपने लिहीलं आहे की, 'छुपे रुस्तम' आम्ही तुम्हाला सांगतो की, किलर सूपनंतर अभिनेता डिस्कवरी प्लसच्या सिक्रेट ऑफ द बुद्धा रिलेक्समध्ये दिसणार आहे. जो २२ जानेवारीला लॉन्च होईल.