मणिकर्णिका : झाशीच्या राणीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन

 मणिकर्णिकाचे  ऑस्ट्रेलियन कनेक्शनही समोर आल्याने त्याचीच जास्त चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे.   

Updated: Jan 26, 2019, 06:54 PM IST
मणिकर्णिका : झाशीच्या राणीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन  title=

नवी दिल्ली : देशाच्या ७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीच 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगना रानौतची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत कमाईच्या आकड्यांविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी मणिकर्णिकाने आतापर्यंत ८.७५ कोटींचा गल्ला जमवल्याचे सांगितले आहे. राधा कृष्ण जगरालमुडी आणि खुद्द कंगना रानौतने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातून १८५७चा रणसंग्राम आणि देशासाठी पेटून उठणारी मशाल धगधगती मशाल झालेल्या झाशीच्या राणीच्या पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पण मणिकर्णिकाचे  ऑस्ट्रेलियन कनेक्शनही समोर आल्याने त्याचीच जास्त चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे.   

 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी राणी लक्ष्मीबाईंचे वकील जॉन लॅंग यांची आठवण तिथले पंतप्रधान टॉनी एबॉट यांना करुन दिली होती. एवढंच नव्हे तर जॉन लॅंग संबधी कागदपत्रेही मोदी यांनी त्यांना भेट दिली. मोदींनी यावेळी झाशीची राणीचे ऑस्ट्रेलियन वकिल जॉन लॅंग यांचे झाशी आणि वाराणसी कनेक्शनची माहिती दिली होती. राणी लक्ष्मीबाई यांचे वकिल जॉन लॅंग यांनी 8 जून 1854 ला झाशीच्या राणीच्या वतीने गवर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना 'डॉक्टरीन ऑफ लॅप्स' संदर्भात एक याचिका दाखल केली होती.   विशेष म्हणजे राणी लक्ष्मीबाई या वाराणसीशी संबधित होत्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मतदार संघातून खासदार होते.

जॉन लॅंग यांचा जन्म 1816 साली सिडनीमध्ये झाला. ते केवळ वकिलच नव्हते तर त्यांना पत्रकार आणि साहित्यीकाच्या रुपातही ओळखले जायचे. जगभराचा प्रवास करायला त्यांना आवडत असे. 1842 मध्य समुद्री रस्त्याने भारतात आले आणि इथेच त्यांनी आपले घर बनवले. भारतात पोहचल्यानंतर 3 वर्षांनी म्हणजेच 1845 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील दैनिक 'द मुफस्सीलाइट' ला सुरुवात केली. पुढचे काही दिवस मसूरी येथून हे दैनिक सुरू होते. 

पंतप्रधान मोदी यांनी टॉनी एबॉट यांना दिलेल्या भेटीमध्ये एक फोटोग्राफ आणि काही कागदपत्रे होती. 11 मे 1861 ला क्राइस्ट चर्च, मसूरी येथे जॉन लॅंग यांचे माग्रेट वॅटर यांच्या विवाह नोंदणीच्या कागदपत्रांचे फोटो, कॅमल बॅक रोडवरील समाधी स्थळी जॉन लॅंग आणि मसूरी यांचा फोटो आणि क्राइस्ट चर्च मसूरीमधील जॉन लॅंग यांच्या आठवणीतील स्मरण पत्रिकेचा फोटो देखील होता.