नकली नोटांची छपाई केल्याप्रकरणी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीसह आई, बहिणीला अटक

लोकप्रिय मल्याळम टीव्ही अभिनेत्री सूर्या शशिकुमार हिला नकली नोटांची छपाई केल्याच्या आरोपांवरुन पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Jul 6, 2018, 12:39 PM IST
नकली नोटांची छपाई केल्याप्रकरणी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीसह आई, बहिणीला अटक title=
फाईल फोटो

मुंबई : लोकप्रिय मल्याळम टीव्ही अभिनेत्री सूर्या शशिकुमार हिला नकली नोटांची छपाई केल्याच्या आरोपांवरुन पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासह तिची आई व बहिणालाही गुरुवारी पोलिसांनी कोचीहून अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पासून घरात नकली नोटा छापण्याचा त्यांचा उद्योग सुरु होता, अशी कबुल आरोपींनी दिली आहे.

म्हणून निवडला हा वाम मार्ग

अभिनेत्री सूर्या शशिकुमार हिच्या घरी नकली नोटांची छपाई केली जात होती. पूर्वी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या अभिनेत्री हा वाम मार्ग निवडला आणि यात तिच्या आई व बहिणीनीही तिला साथ दिली. पोलिसांनी या तिघींनाही अटक केली असून त्यांच्या घरातून नकली नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे. याच प्रकरणात अजून दोघांना अटक करण्यात आली असून यात अटक केलेल्यांची संख्या आता आठ झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छापले तब्बल इतके लाख

या अभिनेत्रीच्या घरातून थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बर २ लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नकली नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कागद, प्रिंटर्स आणि इतर सामान ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत ५० लाखांच्या नकली नोटांची छपाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.