मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट ते बॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री मालविका मोहननला (Malavika Mohanan)सगळेच ओळखतात. मालविकाचे लाखो चाहते आहेत. मालविका सोशल मीडियावरही तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मालविका तिनं नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली असून तिच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मालविकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मालविकानं तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालविकानं पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केली आहे. तर तिच्या हातात कॉफी मग आहे. हे फोटो शेअर करत मालविका म्हणाली, 'तीन दिवसांपासून आजारी होते. मला 103 इतका ताप होता ज्यामुळे मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे, अशक्त झाले होते. पण असा सुर्यास्त आणि शुद्ध हवेमुळे मला लगेच बरं वाटलं.
मालविकाची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरी हो असं म्हटलं आहे. मालविकाच्या चाहत्यांना तिची किती चिंता आहे हे दिसून येते. (malavika mohanan was down with 103 degrees fever shares a post on her health update)
मालविकानं 2013 मध्ये दाक्षिणात्य चित्रपट 'पट्टम पोल'मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. माजिद माजिदीच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' या हिंदी चित्रपटात मालविका चर्चेत आली होती. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून मालविकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर आता मालविकाचा दुसरा हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'युद्ध' या बॉलिवूड चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मालविका मोहन नेहमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मालविकाचे लाखो चाहते आहेत. मालविकाचे इन्स्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत जे तिच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.