मलायकापासून तिच्या जवळची व्यक्ती जातेय दूर, मलायकाला हा विरह सोसेल का?

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा बऱ्याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते. 

Updated: Aug 17, 2021, 03:26 PM IST
मलायकापासून तिच्या जवळची व्यक्ती जातेय दूर, मलायकाला हा विरह सोसेल का?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा बऱ्याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते, पण यावेळी ती तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मलायकाने तिचा मुलगा अरहानबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याबद्दल लोक चर्चा करत आहेत.

खरं तर मलायकाने तिच्या इंस्टा अकाउंटवर मुलगा अरहान सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघंही खिडकीच्या बाहेर पाहताना दिसत आहेत. या शेअर करत मलायकाने लिहिलं आहे की, 'आम्ही दोघं एक नवीन प्रवास सुरु करत आहोत जो घाबरणं, भीती, उत्साह आणि अंतराच्या भावनांनी परिपूर्ण आहे. मला एवढंच माहित आहे की, मला तुझा अभिमान वाटतो, खुल्या आकाशात तुझ्या पंखांनी तुझी स्वप्नं पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मला आतापासून तुझी आठवण येत आहे'

मलायकाचा मुलगा अरहान आता 18 वर्षांचा आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित त्याने पुढील शिक्षणासाठी मुंबई सोडली आहे. म्हणूनच मलायकाने ही पोस्ट शेअर केली आहे. अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानचा ताबा घटस्फोटानंतर आईकडे आहे. पण अरबाज अनेकदा तिच्यासोबत आणि मुलगा अरहानसोबत वेळ घालवताना दिसतो. घटस्फोटाच्यावेळी अरबाज म्हणाला होता की, मला मलायकासोबत मुलाच्या ताब्यासाठी कधीच लढायचं नाही, 18 वर्षानंतर अरहान स्वत:चा निर्णय स्वत: घेवू शकतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायका आणि अरबाज यांनी 1998 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 17 वर्षानंतर त्यांनी 2016 मध्ये अचानक विभक्त होण्याची घोषणा केली आणि नंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मलायका आजकाल अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाजचे नाव जॉर्जिया अँड्रियानीशी देखील जोडलं गेलं आहे. अरबाज अनेकदा जॉर्जियासोबत स्पॉट होतो.