Malaika Arora अपघातानंतर दिसली 'या' ठिकाणी, खास व्यक्तींकडून जंगी स्वागत

अपघातानंतर मलायता चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुन्हा सज्ज, खास व्यक्तींकडून जंगी स्वागताचे फोटो व्हायरल   

Updated: Apr 27, 2022, 09:14 AM IST
Malaika Arora अपघातानंतर दिसली 'या' ठिकाणी, खास व्यक्तींकडून जंगी स्वागत title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. मलायकाच्या कठीण समयी अर्जुन तिच्यासोबतचं होता. अपघातानंतर मलायका पुन्हा सक्रिय झाली आहे. 

मलायका आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करण्यासाठी अपघातानंतर रेड कर्पेटवर परतली आहे. मलायकाने रेड कार्पेटवर पाय ठेवताचं जवलेल्या सर्व खास लोकांनी अभिनेत्रीचं जंगी स्वागत केलं आहे. 

अपघातानंतर शुटींग करणं मलायकासाठी थोडं कठीण असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या तिचे रेड कार्पेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्या काळ्या ड्रेससमध्ये मलायका प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

अपघातात मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.