अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

'झलक दिखलाजा सीझन 11' लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे.

Updated: Oct 10, 2023, 06:30 PM IST
अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : 'झलक दिखलाजा सीझन 11' लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे. दरम्यान, शो सुरू होण्यापूर्वी मलायकाचा एक व्हिडिओ सेटवरून समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री शिमरी ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर येताना दिसली आहे. मलायकाचा हा व्हिडिओ प्रोमो शूट करताना काढण्यात आला होता, जो काही मिनिटांतच व्हायरल झाला होता. 

अभिनेत्रीने घातला ट्रांसपरंट ड्रेस
हा व्हायरल व्हिडिओ 'झलक दिखलाजा सीझन 11' च्या सेटवरील आहे. झलकचा प्रोमो शूट करण्यासाठी अभिनेत्री हा ड्रेस घालून सेटवर पोहोचल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मलायका व्हॅनिटी व्हॅनमधून सेटच्या बाहेर येताच तिने कॅमेराकडे पाहून किलर पोज देण्यास सुरुवात केली. मलायकाचा हा किलर अवतार लोकांना वेड लावत आहे.

कॅमेरात कैद
व्हिडिओमध्ये मलायका अरोराने स्किन कलरचा शिमरी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस तिच्यावर इतका खुलून दिसतोय की, तिचा हा लूक पाहून तिचे चाहते फिदा होणार यात काहीच शंका नाही. यावेळी मलायका अरोराने कॅमेऱ्यासमोर बोल्ड स्टाईलमध्ये किलर पोज दिल्या आहेत. मलायकाचा हा ड्रेस बॅकलेस आहे. यासह, तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्री केस मोकळे सोडले आहेत, गळ्यात सुंदर चोकर आहे. याचबरोबर तिने तिचा हा लूक पुर्ण करण्यासाठी लाईट मेकअप केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, हा शो १ नोव्हेंबरपासून प्रसारित होण्याची शक्यता आहे. आमिर अली व्यतिरिक्त या शोमध्ये अंजली आनंद, ईशा सिंह, सुरभी ज्योती, मनीषा राणी, राजीव ठाकूर, कुस्तीपटू संगीता फोगट, शोएब इब्राहिम आणि ट्विंकल अरोरा या स्पर्धकांच्या प्रवेशाची बातमी आहे.  'सीझन 10'ला नोरा फतेही, करण जोहर आणि माधुरी दीक्षित यांनी जज केलं होतं. मात्र यावेळी फराह खान आणि मलायका यांच्याशिवाय तिसऱ्या जजचे नाव निश्चित झालेलं नाही. मात्र, जज म्हणून अर्शद वारसीचे नाव निश्चित मानलं जात आहे.