मुंबई : सध्या मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच अर्जुन कपूरने मलायकासोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही खूप खुश दिसत होते. 2017 मध्ये मलायका अरबाज खानपासून वेगळे झाली. दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांची वेगळे होम्याची अनेक कारणे समोर आली. पण दोघेही यावर कधीच उघडपणे बोलले नाहीत. अरबाज आणि मलायकाला जेव्हा जेव्हा त्यांच्या घटस्फोटाबद्दल विचारम्यात आले तेव्हा-तेव्हा त्या दोघांनीही हा प्रश्न टाळला आहे.
सध्या मलायका आणि अरबाजची साजिद खानसोबतची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा मलाईका आणि अरबाज एकत्र होते. या व्हिडीओमध्ये साजिद खान मलाइकाला अरबाजबद्दल काही प्रश्न विचारतो आणि त्याची खरी उत्तर द्यायला सांगतो.
साजिद खान मलाईकाला विचारतो की, मला अरबाजबद्दल अशी एक गोष्ट सांग जी तुला सर्वात जास्त आवडते आणि एक अशी गोष्ट सांगा जी तुला आवडत नाही. याला उत्तर देताना मलायका म्हणते, "मला सगळ्यात जास्तं त्याची प्रेम करण्याची पद्धत आवडते. तो त्यांचं प्रेम कधीच व्यक्त करत नाही, पण तरीही मला ते समजते. कदाचित हे आमच्या बाँडिंगचा परिणाम असेल. तो ज्या प्रकारे मला आनंदी ठेवतो आणि मला नेहमी हसवतो, हीच अरबाजची सर्वात चांगली गोष्ट आहे."
मलायका तिचा मुद्दा पुढे चालू ठेवते आणि म्हणते, "त्यांच्याबद्दल सर्वात वाईट गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर तो खूप निष्काळजी आहेत. ते कुठलीही वस्तू घरात कुठेही ठेवतो आणि मला त्याची खूप चीड येते. पूर्वी त्यांचा हा बेजबाबदारपणा थोडी कमी होता, पण आता हळूहळू तो वाढत चालला आहे."
यावरर अरबाज म्हणतो, "मलायका अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळते. परंतु मलायका आपली चूक कधीच मान्य करत नाही. हे खरोखर माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे."
यांचे एकमेकांवरती इतकं प्रेम असून सुद्धा या दोघांवरती वेगळे होण्याची वेळ आली. सुरूवातीला याबद्दल बोलताना अरबाज खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, 'एक वेळ अशी आली होती की मला वाटू लागले की, आता आपण वेगळे व्हावे. माझा मुलगा त्यावेळी खूप लहान होता, पण त्याला आमच्या घरातील वातावरण चांगलेच माहीत होते. त्यावेळेस माझा मुलगा 12 वर्षांचा असेल, म्हणून मला त्याला जास्त सांगावे लागले नाही. माझ्या मुलाच्या ताब्यासाठी मी कधीही संघर्ष केला नाही. कारण मला असं वाटतं की, या सगळ्या गोष्टी फक्त आईच सांभाळू शकते."