मलायका अरोराचा अपघात; कधी मिळणार डिस्चार्ज, प्रकृती अद्यापही...

शनिवारी मलायकाच्या कारला अपघात, सध्या कशी आहे तिची प्रकृची, चाहत्यांना सतावतेय आभिनेत्रीची चिंता  

Updated: Apr 3, 2022, 08:14 AM IST
मलायका अरोराचा अपघात; कधी मिळणार डिस्चार्ज, प्रकृती अद्यापही...  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोराचा शनिवारी कार अपघात झाला. त्यानंतर तिला तात्काळ पनवेल येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका अपघात झाल्यामुळे चाहत्यांनी अभिनेत्रीची चिंता सतावत आहे. मलायकाची प्रकृती आता स्थित आहे. पण तिला एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. 

मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. जेव्हा अपघात झाला तेव्हा मलायका धक्का बसला, पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. 

मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.