मलायका अरोराचा कार अपघात; अभिनेत्री रुग्णालयात दाखल

भिनेत्री मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे.

Updated: Apr 2, 2022, 09:57 PM IST
मलायका अरोराचा कार अपघात; अभिनेत्री रुग्णालयात दाखल title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीचा कार अपघात झाला असून, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वृत्तानुसार, मुंबईजवळील पनवेल परिसरात मलायकाच्या कारला अपघात झाला आहे.

मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.

एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती दिली आहे. मनसे पदाधिकारी जयराम लांडगे म्हणाले की, 'आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबईला जात होतो. त्यानंतर पनवेलजवळ मलायकाच्या कारचा तोल बिघडला आणि तिची कार आमच्याच्या तीन गाड्यांना धडकली. या अपघातात मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. आणि तिला अपोलो हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.