मुंबई : मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
मर्सल चित्रपटात मोदी सरकारच्या जीएसटी कररचना तसंच डिजिटल इंडिया या दोन महत्त्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपनं मर्सल चित्रपटातून ती संबंधित दृश्यं काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या चित्रपटाला समर्थन दर्शवत, भाजपच्या भूमिकेचा निषेध केला आहे. तर विविध थरांतूनही या प्रकरणी भाजपविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत.
मर्सलच्या प्रोड्यूसर आणि Sri Thennandal Films च्या सीईओ हेमा रुकमिणी यांनी ट्विटरवर माफी मागत एक लेटर शेअर केले आहे.
#Mersal @MuraliRamasamy4 @ThenandalFilms pic.twitter.com/A3jq9bAejl
— Hema Rukmani (@Hemarukmani1) October 21, 2017
मर्सल हा आमचा १०० वा चित्रपट आहे. या चित्रपटाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळत असल्याची माहितीदेखिल देण्यात आली आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेता विजयच्या कामाचेदेखिल कौतुक होत आहे. आम्ही कोणच्या भावना दुखावण्याच्या हेतुने सिनेमा बनवला नाही. केवळ सामान्यांच्या भावना मांडण्यासाठी ही कलाकृती बनवली आहे. मात्र नकळत कोणाला त्रास झाल्यास आम्ही त्यांची माफी मागतो. असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
मर्सलमधील काही वादग्रस्त भाग हटवण्याच्या मागणीनंतर निर्मात्यांनीही नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी काही सीन्सला हटवण्याची तयारी दाखवली आहे.