.. मग 'बाहुबली २' प्रमाणे 'गोलमान अगेन'ही रचणार हा विक्रम

'गोलमाल अगेन' या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये दमदार कामगिरी आहे.

Updated: Oct 22, 2017, 06:40 PM IST
.. मग 'बाहुबली २' प्रमाणे 'गोलमान अगेन'ही रचणार हा विक्रम  title=

मुंबई : 'गोलमाल अगेन' या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये दमदार कामगिरी आहे.

पहिल्या दिवशी ३०.१४ कोटी आणि दुसर्‍या दिवशी २८.२५  कोटी  कमाई करत बॉक्स ऑफिसवर एकूण ५८.३९ कोटींची बॉक्सऑफिसवर बंपर कमाई केली आहे. 

'गोलमाल अगेन'ने पहिल्या दोन दिवसांप्रमाणेच तिसरा दिवसही तुफान कमाईचा राहिल्यास हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल. याकरिता तिसर्‍या दिवशी 'गोलमाक अगेन'ला ४२ कोटींची कमाई करावी लागणार आहे.  असे झाल्यास बाहुबलीप्रमाणे तिसर्‍या दिवशी हा सिनेमा १०० कोटी कमावण्यात यशस्वी ठरणार आहे. 

२०१७ सालातील बॉक्सऑफिसवरील कमाई पाहता अजय देवगणने आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खानला मागे टाकले आहे. 

'गोलमाल अगेन' हा 'गोलमाल'चा चौथा सिक्वेल आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी दर दोन वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवतो. परंतू यंदा चौथा सिक्वेल बनवण्यासाठी त्याने सुमारे ७ वर्षांचा वेळ घेतला आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगन सोबत अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल केमू, श्रेयस तळपदे, जॉनी लीवर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तबू आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.