रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा

Mahesh Manjrekar Savarkar Biopic  : महेश मांजरेकर हे वीर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते. मात्र, रणदीप हुड्डानं असं काय केलं की महेश मांजरेकरांनी दिला होता नकार...

दिक्षा पाटील | Updated: Aug 9, 2023, 06:00 PM IST
रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Mahesh Manjrekar : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'स्वातंत्र वीर सावरकर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. फक्त अभिनेता नाही तर रणदीप या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की रणदीप हुड्डा आधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी महेश मांजरेकर यांना घेतले होते. ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पण त्यानंतर कळलं की रणदीप हुड्डा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी या विषयी सांगितलं आहे. 

महेश मांजरेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी खुलासा केला की ते आधी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तर रणदीप हुड्डानं या चित्रपटात अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. तर चित्रपटात होणारे बदल पाहून महेश मांजरेकरांनी चित्रपट सोडला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महेश मांजरेकरांनी यावेळी सांगितले की रणदीप हुड्डानं या भूमिकेसाठी ज्या प्रकारे रिसर्च केला, त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर खूप जास्त परिणाम झाला होता. याविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, मी रणदीपला भेटलो तेव्हा तो खूप हुशार आहे हे मला कळलं आणि तो त्या प्रोजेक्टमध्ये खूप गुंतला होता. आमच्या अनेक मीटिंग्स झाल्या. त्यानं या विषयावर आधारित अनेक पुस्तके वाचली. मी त्याची आवड पाहिली. त्यानं पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला ज्यात त्याला खूप बदल हवे होते. पण मग त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टमध्ये देखील त्यांना बदल हवे होते. मी त्याला म्हटलं की जर असंच होणार असेल तर या चित्रपटात प्रॉबलम होणार. मी त्याला म्हटलं की 'असं झालं तर या चित्रपटाला अडचण येईल. एकदा स्क्रिप्ट फायनल झाल्यावर तो मला कोणतेही प्रश्न विचारणार नाही असे त्यानं आश्वासन दिले.

हेही वाचा : बंगळुरुची आलिया: झुमका गिरा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल, हुबेहूब तशीच

महेश मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, 'रणदीपच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या, ज्या त्याला स्क्रिप्टमध्ये हव्या होत्या. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. महेश मांजरेकर म्हणाले, 'मला वाटले की तो मला चित्रपट कसा बनवायचा हे सांगत आहे. मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले. मला पुन्हा जाणवले की तो मला काम करू देत नाही आहे. मी निर्मात्यांना भेटलो. मी त्याला सांगितले की जर आम्ही दोघे या चित्रपटाचा भाग असू तर हा चित्रपट बनणार नाही. त्यामुळे एकतर मी चित्रपटात असेल किंवा रणदीप, निर्मात्यांना आता कळत असेल की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला.'