आलियाच्या वडिलांचे खरे नाव 'अस्लम'? कंगना रनौतने शेअर केला व्हिडिओ

 धर्मांतर केलेच आहे तर त्यांनी एका विशिष्ठ धर्माचेच प्रतिनिधित्व करायला हवं, असेही कंगनाने म्हटलं आहे.

Updated: Sep 4, 2022, 08:44 PM IST
आलियाच्या वडिलांचे खरे नाव 'अस्लम'? कंगना रनौतने शेअर केला व्हिडिओ  title=

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर बोलताना कंगना उघडपणे त्याचा विरोध करत असते.

अशातच आता कंगनाने दिग्दर्शक महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने महेश भट्ट मुस्लिम असल्याचा आरोप केला आहे. कंगना रनौतने महेश भट्टचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते मुस्लीम कार्यक्रमाला संबोधित करताना उर्दूचे उच्चार करताना दिसत आहेत.

कंगना रनौतने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. "महेश भट्ट अतिशय सभ्य आणि काव्यमय पद्धतीने लोकांना दंगल करण्यास प्रवृत्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये महेश भट्ट म्हणत आहेत की, जरा तुमच्या ताकद जागी करा. मी इस्लामबद्दल जेवढे वाचले आहे त्यावरुन मला एकच गोष्ट समजली आहे की घाबरणारा माणूस मुस्लिम असू शकत नाही."

व्हिडिओमध्ये महेश भट्ट म्हणाले की, 'जेथे भीती आहे तिथे इस्लाम नाही आणि जिथे इस्लाम आहे तिथे भीती नाही. जसे जेथे अंधार आहे तेथे प्रकाश नाही आणि जेथे प्रकाश आहे तेथे अंधार नाही. माझे प्रिय मित्र महमूद मदनी साहेब यांनी मला एक हदीस लिहिली होती जी माझ्या कॉम्प्युटवर आहे. ही हदीस वाचल्यानंतर महेश भट्ट यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले आणि म्हणाले, मदत करा. तुमच्या भावाला मदत करा, जर तो गरीब असेल तर त्याला मदत करा आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याला मदत करा.

व्हिडिओमध्ये महेश भट्ट म्हणत आहेत की ही हदीस जॉर्ज बुश आणि नरेंद्र मोदींनी वाचली पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करत कंगना रनौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे की, मला सांगण्यात आले आहे की त्यांचे नाव अस्लम आहे आणि त्यांनी दुसऱ्या पत्नीशी लग्न करण्यासाठी त्यांचे नाव बदलले आहे. किती सुंदर नाव आहे, का लपवले?

111

त्यांना त्यांच्या खऱ्या नावाचा वापर करायला हवा. जर त्यांनी धर्मांतर केलेलेच आहे तर त्यांनी एका विशिष्ठ धर्माचेच प्रतिनिधित्व करायला हवं, असेही कंगनाने म्हटलं आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यात आलिया (alia bhatt) आणि रणवीर (ranbir kapoor) यांचा ब्रम्हास्त्र (brahmastra) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच कंगनाने हे धक्कादायक ट्विट केलं आहे.