Mahesh Babu च्या मराठमोळ्या पत्नीची खास पोस्ट, म्हणाली,,,

Namrata Shirodkar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या खास फोटोनंतर त्यावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

Updated: Feb 10, 2023, 02:45 PM IST
Mahesh Babu च्या मराठमोळ्या पत्नीची खास पोस्ट, म्हणाली,,, title=

Mahesh Babu and Namrata Shirodkar Wedding Anniversary : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूनं मराठ-मोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी (Namrata Shirodkar ​) लग्न केलं.या दोघांची जोडी ही फक्त दाक्षिणात्या प्रेक्षकांच्या नाही तर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची आवडती आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतात. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर या दोघांच्या लग्नाला आज 18 वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्तानं नम्रतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं महेश बाबूला शुभेच्छा दिल्या आहेत. 

नम्रतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नम्रतानं तिचा आणि महेश बाबूचा एक कोझी फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत "18 वर्षांपूर्वी आजच्या दिवस आपण घेतलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या निर्णयांला आज सेलिब्रिट करतोय. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" असं कॅप्शन नम्रतानं दिलं आहे. नम्रतानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या फोटोला आता पर्यंत एक लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नम्रतानं शेअर केलेल्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, सगळ्यात सुंदर जोडीला लग्नाच्या खूप-खूप शुभेच्छा. तर एका नेटकऱ्यांनं कमेंट करत आज 18 वर्षे झाली माझ्या ब्रेकअपला, पण तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

हेही वाचा : Kiara Advani ची नाचत-ठुमकत स्वत: च्या लग्नात एन्ट्री, Unseen Video समोर

दरम्यान, तुम्हाला माहितीये का? की महेश मांजरेकर हे नम्रता शिरोडकरच्या प्रेमात होते. नम्रता शिरोडकर आणि महेश मांजरेकर पहिल्यांदा वास्तवच्या सेटवर भेटले. त्यावेळी त्यांच्यातील मैत्री वाढत गेली. याच काळात त्यांच्यातील नात्याची चर्चा सुरू होती. वास्तवमध्ये संजय दत्तसोबत (Sanjay Dutt) नम्रता दिसली होती. त्यावेळी मांजरेकरांचं लग्न देखील झालं होतं. एका वादामुळे दोघांचं नात जास्तवेळ टिकलं नाही, असे म्हटले जाते. काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप देखील झाला. नम्रता शिरोडकरने त्यानंतर साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत (Mahesh Babu) लग्न केलं. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) 1995 मध्ये ‘आई’ हा चित्रपट दिग्दर्शित करत होते, त्यावेळी (mahesh manjrekar wife) मेधा मांजरेकर यांच्याशी त्यांचं नातं जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता