लवरात्रीचे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला

सलमान खान बॅनरचा सिनेमा लवरात्रीचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Updated: Aug 14, 2018, 01:20 PM IST
लवरात्रीचे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला title=

मुंबई : सलमान खान बॅनरचा सिनेमा लवरात्रीचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. गुजराती संगीत आणि गरबा यांनी नटलेले हे गाटे फारच धमाकेदार आहे. सलमान खान गुजरातच्या वडोदरामध्ये हे गाणे लॉन्च करणार आहे. 'चौगाडा तारा' असे या गाण्याचे बोल असून संगीत ठेका धरायला लावण्यासारखे आहे. या सिनेमातून सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. 

आयुष या सिनेमात गरबा टीचरच्या भूमिकेत आहे. गाण्यात त्याचा जबरदस्त गरबा पाहायला मिळत आहे. 'चौगाडा तारा' हे गुजराती लोकसंगीत असून लवरात्रीच्या निर्मात्यांनी सिनेमात याचा प्रयोग केला आहे. तुम्हीही पाहा हे धमाकेदार गाणे...

लवरात्री एक प्रेमकथा आहे. आयुष आणि वरीना हुसैन या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा नवरात्रीच्या काळातील आहे. या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चेंटने केली आहे. या गाण्याची कथा नरेंन भट्ट यांनी लिहीली आहे. तर दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे. तर निर्मितीची जबाबदारी सलमान खानने उचलली आहे. लवरात्री हा सिनेमा ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.