मुंबई : 'चला हवा येऊ द्या' हा शो प्रेक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून खळखळून हसवत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात आता घर करुन आहे. या विनोदवीरांच्या अभिनयामुळे ते आज संपुर्ण महाराष्ट्रावर राज्य करत आहेत.
त्यांच्या अभिनयासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच चर्चेत असते. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. पण सध्या या सेटवरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. झी २४ तासच्या हाती हा व्हिडिओ लागला आहे.
चला हवा येऊ द्या च्या सेटवर घडलेला सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून चाहत्यांना हा व्हिडिओ संभ्रमात पाडणारा ठरत आहे.
शुटींग सुरु असताना पोलिसांच्या टीमनं हवा येऊ द्या मधील कलाकारांविरोधात तक्रार दाखल झाल्याचं सांगितलं आहे. त्यांची चौकशीची करणार असल्याचं ही पोलिस बोलताना दिसत आहेत.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार आहे की, त्यांनी पांडू सिनेमाच्या शुटींग दरम्यान ट्रेनिंग वेळी टिंगल टवाळी केली आहे.
पोलिसांनी थेट भाऊ आणि कुशल यांना सेटवरुन बाहेर नेत त्यांच्यासोबत बातचीत केल्याचं यावेळी दिसून आलं. त्यामुळे सेटवर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका वाढला.
कुशल आणि भाऊ यांनी नुकतीच पांडू या सिनेमात पोलिसांची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार झाल्याने ते देखील चकीत झाले. अखेर या प्रँकचा शेवट करायचा ठरला आणि डॉ. निलेश साबळे यांनी सेटवर आलेल्या पोलिसांची खरी ओळख सगळ्यांना करुन दिली.
हा हवा येऊच्या टीमचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.