डान्स करता-करता घसरला अभिनेत्रीचा ड्रेस , व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा...

 उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड स्टाइलसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.

Updated: Jan 30, 2022, 05:25 PM IST
डान्स करता-करता घसरला अभिनेत्रीचा ड्रेस , व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा... title=

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड स्टाइलसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. क्वचितच असा एखादा दिवस जाईल जेव्हा चाहत्यांना उर्फीची बोल्ड स्टाईल पाहायला मिळत नाही. मग ती कुठेतरी स्पॉट होत असते किंवा मग इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते.

उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांचं कोणत्या ना कोणत्या मार्गानं मनोरंजन करत असतं. आता नुकताच, अभिनेत्रीने तिचा एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती नोरा फतेहीच्या 'दिलबर' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, मात्र व्हिडिओमध्ये असं काही घडलं ज्यामुळे अभिनेत्री  Oops Moment ची शिकार झाली. हे सगळं होताच व्हिडिओमध्ये उर्फी जरा घाबरल्याचं दिसतय पण पुढच्याच काही सेकंदात तिने सगळं हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळलं. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उर्फीने गोल्डन रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची धोती पॅन्ट परिधान केलीये. अभिनेत्रीच्या मागे 'दिलबर गाणं' वाजत आहे आणि ती उत्साहाने डान्स करत आहे. मात्र अचानक उर्फीचा ट्यूब टॉप घसरतो आणि ती तो वर सरकवते. टॉप पुन्हा व्यवस्थित केल्यानंतर अभिनेत्री पुन्हा नाचू लागते. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि दरवेळी प्रमाणे यावेळीही अभिनेत्री ट्रोल होतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ शेअर करताना उर्फीने ट्यूब टॉप घालणं म्हणजे संघर्ष असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने 'स्ट्रगल टू वेअर ट्यूब टॉप' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.