'कोण होणार करोडपती'च्या दिग्गजांची भेट; पॉवरफुल फोटोने चाहत्यांच जिंकलं मन

थोड्याच अवधीत घराघरात प्रसिद्ध झालेल्या सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचलन अभिनेते सचिन खेडेकर करीत आहेत.

Updated: Aug 23, 2021, 12:55 PM IST
'कोण होणार करोडपती'च्या दिग्गजांची भेट; पॉवरफुल फोटोने चाहत्यांच जिंकलं मन title=

मुंबई : महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झालेल्या सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचलन सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करीत आहेत. KBCच्या सेटवर बिग बी अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकर यांच्या भेटीमुळे चाहते खुश झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील 'कोण बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्र संचलन बिग बी अमिताभ बच्चन करतात. त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या खास शैलीमुळे एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं आहे. त्याचप्रमाणे मराठीमधून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे सचिन खेडेकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला त्याच ताकदीची उंची मिळवून दिली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेक्षक व्यक्त करीत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi Serial TRPs Page (@marathiserials_official)

>

नुकताच अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकर KBCच्या सेटवर एकत्र दिसून आले आहेत. KBC चित्रिकरण मुंबईतील फिल्मसिटीत होत आहे. या सेटवर बच्चन यांनी देखील हजेरी लावली आहे.

कोण होणार करोडपती आणि कौन बनेगा करोडपती या दोन्ही कार्यक्रमांचं चित्रिकरण शेजारी शेजारी असलेल्या सेटवर होणार आहे. बच्चन यांना समजले की शेजारच्या सेटवर कोण होणार करोडपतीचे चित्रिकरण सुरू आहे. तेव्हा त्यांनी सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.यावेळी बच्चन यांनी कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. आपण हा कार्यक्रम आवर्जुन पाहत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.