Saira Banu Net Worth : दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती

सायरा बानो या एवढ्या संपत्तीच्या मालकीन 

Updated: Aug 23, 2021, 12:41 PM IST
Saira Banu Net Worth : दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती  title=

मुंबई : दिग्गज कलाकार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची पत्नी सायरा बाने (Saira Banu) यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 साली मसुरीत झाला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलंय. सायरा बानो यांनी 1966 साली आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. 

सायरा बानो यांचं खर नाव नसीम बानो असं आहे. त्यांनी 30-60 च्या दशकात सिनेमात काम केलं आहे. 'जंगली' सिनेमातून सायरा बानो यांनी सिनेसृष्टात पदार्पण केलं. सायरा बानो यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?

सायरा बानो यांची संपत्ती 

Celebrity Net Worth च्या रिपोर्टनुसार, सायरा बानो यांच्याकडे 627 करोडची संपत्ती आहे. सायरा बानो आणि दिलीप कुमार हे मुंबईच्या एका आलिशान बंगलात राहतात. रिपोर्टसनुसार, बंगल्याची किंमत 350 करोड रुपयांची किंमत आहे. हे घर मुंबईतील पॉश परिसरात हिल्समध्ये राहतात. 

सायरा बानो यांचे सिनेमे 

सायरा बानो यांनी 'जंगली' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं. पडोसन, पूरब आणि पश्चिम जमीर सारख्या सिनेमांत काम केलंय. 

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी 

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी खास आहे. सायरा बानो अगदी 12 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. सायरा बानो यांना कायमच दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं. सिनेसृष्टीत पदार्पण करताच दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. सायरा यांचा विवाह दिलीप कुमार यांच्यासोबत झाला तेव्हा त्या अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.