खरंच रणबीर टॉक्सिक पार्टनर आहे? आलिया भट्टच्या कमेंटने सिनेसृष्टीत खळबळ

कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला.

Updated: Nov 16, 2023, 01:04 PM IST
खरंच रणबीर टॉक्सिक पार्टनर आहे? आलिया भट्टच्या कमेंटने सिनेसृष्टीत खळबळ title=

Alia Bhatt on Ranbir Kapoor : कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला. तसा  करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन 8' सतत चर्चेत असतो. या दोन्ही कलाकारांनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.  यावेळी, आलियाने तिच्या एका मागिल विधानावर स्पष्टीकरण दिलं होतं. ज्यात तिने रणबीर कपूर एक टॉक्सिक पार्टनर असल्याचं म्हटलं होतं.

जेव्हापासून तिने रणबीर कपूरशी संबंधित लिपस्टिकबाबत वक्तव्य केल्यापासून तिला सतत ट्रोल केलं जात आहे. याबाबत तिने संताप व्यक्त केला आहे. तर तेव्हापासून रणबीरलाही टॉक्सिक पार्टनर हा टॅग लागला आहे. याविषयीच बोलताना आलिया म्हणाली, 'मला वाटतं की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला विनाकारण वाटतात. मी ते पाहिलं आणि माझ्या टीमला सांगितलं की, आता खूप अति होत आहे. हे चूकीचं होत आहे. मग मी म्हणाले, ठीक आहे, ते जाऊ द्या कारण लोकं काही ना काही नेहमीच बोलत राहतात. काही आर्टिकल असेही आहेत ज्यामध्ये रणबीरला टॉक्सिक व्यक्ती असंही म्हटलं होतं.''

जगात अनेक समस्या
आलिया पुढे म्हणाली, 'जगात एवढे सगळे मुद्दे आहेत ज्यावर लोकं बोलू शकतात. मात्र आम्ही अशा गोष्टीबद्दल बोलत आहोत ज्याचा अर्थ चुकीचा काढला गेला आहे. मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलं की, रणबीरला लोकं जसे समजतात तसा तो अजिबात नाही. लोकांच्या विचारांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे.''

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
याआधी आलियाने वोग इंडियाच्या आर्टिकलला दिलेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये ती रणबीर कपूर आणि स्वत:च्या नात्याबद्दल जरा स्पष्टच बोलली होती. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला होता. यावेळी ती म्हणाली होती की, 'तिला न्यूड लिपस्टिक आवडतात. बहुतेकवेळा मी न्यूड लिपस्टिक लावते. पण लिपस्टिक लावल्यानंतर तो ती लिपस्टिक पुसून टाकतो कारण रणबीर कपूरला लिपस्टिक अजिबात आवडत नाही. रणबीरला माझे नॅचरल ओठ जास्त आवडतात.'' आलियाच्या या वक्तव्यानंतर रणबीरला खूप ट्रोलही करण्यात आलं. लोकं केवळ त्याला टॉक्सिकच नाही तर त्याला नियंत्रित करणारा नवराही म्हणतात.