Story Of Shah Rukh Khan Iconic SRK Pose: जगभरामध्ये भारतातील कोणतीही व्यक्ती त्याच्या इतकी प्रसिद्ध नाही अशी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची ओळख सांगितली जाते. अनेक छोट्या देशांमध्ये तर भारत म्हणजे शाहरुख खानचा देश अशीही ओळख आहे. प्रचंड चाहता वर्ग असलेल्या शाहरुख खानची हातांवाली पोजही भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात आयकॉनिक पोजपैकी एक आहे. मात्र ही पोज त्याला नेमकी कोणी सुचवलं? त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेमध्ये अचानक ही पोज का केली? यासंदर्भातील खुलासा त्यानेच केला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही अशापद्धतीने या पोजचा शोध शाहरुखला लागल्याचं त्याने स्वत: सांगितलं आहे.
77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टीव्हलमध्ये शाहरुखची प्रकट मुलाखत नुकतीच झाली. यामध्ये शाहरुखला एका चाहतीने त्याच्या या आयकॉनिक पोजबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देताना शाहरुखने ही पोज माझी स्वत:ची नसून ती मला सुचवण्यात आली होती असं सांगितलं. आता किंग खानला ही पोज कोणी सुचवली असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर स्वत: त्यानेच दिलं आहे. ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आपल्याला ही पोज सुचवल्याचं शाहरुख म्हणाला. नेमकं तेव्हा काय घडलेलं हे ही त्याने सांगितलं.
ही पोज कशी सुचली या प्रश्नावर शाहरुखने, "मला नाही ठाऊक. खरंच मला काहीच कल्पना नाही," असं उत्तर दिलेलं. 90 च्या दशकामध्ये भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्याला एक गोष्ट करावीच लागायची ती म्हणजे 'डीप', असं शाहरुख म्हणाला. त्यानंतर शाहरुख स्टेजवर उभा राहिला आणि त्याने 'डीप' म्हणजे खांदे हालवत कसा डान्स केला जातो हे स्टेप करुन दाखवलं. मात्र चित्रपटाच्या शुटींगदरम्यान आपल्याला ही स्टेप करता येत नव्हती, असं शाहरुखने मान्य केलं. "मला याची फार लाज वाटली. मी संपूर्ण रात्रभर या डान्सचा सराव केला," असं शाहरुख म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी या गाण्याचं शुटींग केलं जाणार होता. त्यावेळेस शाहरुख सरोज खान यांना भेटला आणि त्यांना आपण तुम्ही सांगितलेली स्टेप करण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र सरोज खान यांनी बेटा हे करायची गरज नाही. तुला डान्स नाही जमत आहे तर तू फक्त उभा राहा आणि तुझे हात लांब करुन एखाद्याला मिठीत घेण्यासाठी पोज देतो तसं कर, असं शाहरुखला सांगितलं. मात्र शाहरुखने रात्रभर सराव केल्याने डान्स स्टेपच करुयात असं म्हटलं. त्यावर सरोज खान यांनी नको, तो डान्स तुला शोभून दिसत नाही असं म्हणत सुचवलेली हात लांबवण्याची पोज देण्याचाच सल्ला दिला. त्यामुळे शाहरुखनेही डान्स करुन आपली फजिती करुन घेण्याऐवजी पोज देण्यास प्राधान्य दिलं.
सरोज यांच्या सल्ल्यानुसार शाहरुखने हात लांबवत पोज दिली आणि ती हीट झाली. यानंतर दुसऱ्या एका सेटवही शाहरुखला जमणार नाहीत अशा काही डान्स स्टेप सेट करण्यात आलेल्या. त्यावेळी शाहरुखनेच नृत्यदिग्दर्शकाला सरोज यांनी सांगितलेली पोज मी देतो असा सल्ला दिला आणि ती पोज करुन दाखवली. ही पोज त्या डान्समध्येही फिट बसल्याने यासाठी मान्यता देण्यात आली, असं शाहरुख म्हणाला.
त्यानंतर शाहरुख ती पोज करत स्टेजवर उभा राहिला. "मी त्यात सायन्सचा समावेश केला. तुम्हाला काही ठरावीक अँगलमध्ये पाय ठेऊन पोज द्यायची आहे," असं शाहरुखने म्हटल्यानंतर सारेच चाहते ओरडून प्रतिसाद देऊ लागले. त्यावर शाहरुखने, "नाही नाही असं काही नाहीये सायन्स यामागे, मी तुम्हाला वेड्यात काढतोय. मी केवळ उभा राहतो आणि हे असे हात पसरवतो," असं हसत म्हटलं. तुम्हीच पाहा शाहरुखचा हा व्हिडीओ...
KING KHAN shares story behind the iconic SRK pose! Learn how Shah Rukh Khan's signature move became a symbol of his charisma and success
SRK IN LOCARNO@iamsrk @FilmFestLocarno#ShahRukhKhan #PardoAllaCarriera #LocarnoFilmFestival #King pic.twitter.com/xhkFEq7gLe
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 11, 2024
शाहरुख लवकरच 'किंग' चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट सुजोय घोष दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटामध्ये सुहाना खान आणि अभिषेक बच्चनही प्रमुख भूमिकेत असणार आहेत.