आलिया-रणबीर पाठोपाठ किम शर्मा-लिएंडर पेस अडकणार लग्नबंधनात

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: May 6, 2022, 09:37 PM IST
आलिया-रणबीर पाठोपाठ किम शर्मा-लिएंडर पेस अडकणार लग्नबंधनात title=

मुंबई : भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दोघंही लवकरच कोर्ट मॅरेज करणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यासाठी आई-वडील दोघंही मुंबईत आले होते. आई-वडील दोघंही किमच्या वांद्रे येथील घरी जमले होते. लवकरच दोघही विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी कोर्ट मॅरेजचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी किम आणि लिएंडरचे पालक गेल्या वर्षी एकमेकांना भेटले होते. त्यानंतर सळ्यांनी मिळून नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्याचबरोबर सोशल मीडियावर दोघांचाही फोटो एकत्र पाहायला मिळत आहे. यानंतर त्यांच्या चाहत्यांना लिएंडर आणि किमचं लवकरच लग्न झालेलं पाहायचं होतं. आता समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच हे कपल कोर्ट मॅरेज करणार आहे.

किम शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 2000 साली यशराज बॅनरच्या मोहब्बतें या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने तुमसे अच्छा कौन है, जिंदगी रॉक्स, मनी है तो हनी है सह इतर चित्रपट केले आहेत. सध्या किम बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.