KGF फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; रुग्णालयात दाखल

ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून कब्बन पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Jun 30, 2022, 03:12 PM IST
KGF फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; रुग्णालयात दाखल title=

मुंबई : KGF फेम अभिनेता  बी एस अविनाशचा बुधवारी बंगळुरूमध्ये कार अपघात झाला. अविनाशच्या मर्सिडीज बेंझचा ट्रकसोबत अपघात झाला. ही बातमी कळल्यानंतर सगळ्यांनाच या अभिनेत्याची काळजी वाटू लागली आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार आता हा अभिनेता ठीक आहे. त्याला फारशी दुखापत झालेली नाही. खरंतर, बुधवारी सकाळी अनिल कुंबळे सर्कलजवळ अविनाश गाडीत असताना एक ट्रक त्याच्या कारला धडकला. यावेळी तिथे वॉकला असलेली लोकं त्याच्या मदतीसोठी धवून गेले आणि त्याला कारमधून बाहेर काढलं. आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून कब्बन पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश वर्कआऊटसाठी जिममध्ये जात असल्याचं बोललं जात आहे.

केजीएफमध्ये दमदार भूमिका
अविनाशने यश स्टारर KGF मध्ये अँड्र्यूची भूमिका साकारली होती. जो स्थानिक टोळीचा बॉस आहे. पहिल्या भागात त्याचं पात्र मोठं होतं. मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात त्याची भूमिका इतकी मोठी नव्हती. दिवंगत अभिनेता चिरंजीवी सर्जा यांच्यामुळे अविनाशला KGF चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अविनाशने सरजाच्या एका मित्रामार्फत चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर भुवन गौडा यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी अविनाशची प्रशांत नीलशी ओळख करून दिली.

केजीएफनंतर मिळाल्या मोठ्या ऑफर
अविनाशने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 2015 पासून त्याने KGF चॅप्टर 1 चं प्रशिक्षण सुरू केलं. केजीएफचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर त्याला आणखी अनेक चांगल्या ऑफर्स मिळाल्याचेही त्याने सांगितलं.