केबीसी : अमिताभ बच्चन यांची नोकरी धोक्यात

काय आहे ही गोष्ट 

केबीसी : अमिताभ बच्चन यांची नोकरी धोक्यात title=

मुंबई : कौन बनेगा करोडपती सिझन 10 मध्ये मंगळवारी खास एपिसोड बाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारा आर्यन शर्मा जिंकला आणि हॉट सीटवर बसला. आर्यन सहावीत शिकणारा विद्यार्थी असून त्याचं वय फक्त 11 वर्षे आहे. 

अमिताभ बच्चन कार्यक्रमाला जशी सुरूवात करणार तेवढ्यात आर्यनने बिग बींना विनंती केली की, आजच्या खेळाचे नियम मला सांगायचे आहेत. ज्यानंतर अमिताभ यांनी आर्यनला ही संधी दिली. आर्यन खेळातील एक एक नियम दर्शकांना सांगत होता. या कार्यक्रमात पत्रकार ऋचा अनिरूद्ध चौथ्या लाइफ लाइन आस्क द एक्सपर्ट म्हणून उपस्थित होती. 

कार्यक्रमात ऋचा आर्यनला सांगते की, एक दिवस तू कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम होस्ट करशील. त्यावर अमिताभ बच्चन सांगतात की, नक्कीच माझी नोकरी धोक्यात आहे. अमिताभ बच्चन कायमच केबीसीमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच मनापासून कौतुक करत असतात.