कतरिना कैफनं लपवलं बेबी बंप? , सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

 कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 7, 2022, 02:25 PM IST
कतरिना कैफनं लपवलं बेबी बंप? , सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

कतरिनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कतरिना मुंबई विमानतळावर असल्याचे दिसतं आहे. कतरिना गाडीतून उतरते आणि विमानतळाकडे जाते. कतरिनानं यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. कतरिनाची अर्ली मॉर्निंग फ्लाइट असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कतरिनानं ट्रॅक पॅन्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, कतरिनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिनं स्मार्ट पद्धतीनं तिचं बेबी बंप लपवल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना आणि विकी ते लवकरच आई-वडील होणार आहेत या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्या दोघांनी याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे कतरिना आणि विकीला ही गोष्टी खासगी ठेवायची आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे.