कुठे आहे पहिला करोडपती.. आता जगतोय असलं आयुष्य.. पत्नी करते हे काम..

केबीसी मध्ये रक्कम जिंकून हर्षवर्धन पॉप्युलर तर झाला मात्र तो सिव्हिल ची पुढील तयारी पूर्ण करू शकला नाही 

Updated: Aug 7, 2022, 02:16 PM IST
कुठे आहे पहिला करोडपती.. आता जगतोय असलं आयुष्य.. पत्नी करते हे काम..  title=

KBC NEWS: 'दैवीयो और सज्जनो स्वागत है आपका' हे शब्द कानावर पडले कि आपल्याला आठवतो एक शो तो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' गेली २२ वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.आजपासून या शोचा नवीन सीझन चालू होतोय आजवर अनेकांना या शोने करोडपती बनवलं बऱ्याच जणांचं आयुष्य त्यामुळे बदललं. आज सुरु होणारा नवीन सीजन बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येत आहे पण याच निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
 
 तुम्हाला सर्वात पहिला झालेला करोडपती आठवतो का?कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीजन आणि त्या सीजन मध्ये एक व्यक्ती ठरला होता पहिला करोडपती 
आज हा व्यक्ती कुठे आहे?मिळालेल्या पैशातून त्याने काय केलं? त्याच सध्या आयुष्य कसं चालू आहे? याची कल्पनादेखील करवणार नाही चला तर मग जाणून घेऊया  

आता कुठे आहे आणि काय करतोय पहिला करोडपती 

2000 साली 'कौन बनेगा करोडपती' चा पहिला सीजन टीव्हीवर सुरु झाला ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यावेळी हाय्येस्ट मणी प्राईझ होती 1 करोड रुपये 
बऱ्याच स्पर्धकांनी शोमध्ये हजेरी लावली काही किंमत जिंकलीसुद्धा पण कोणीही 1 करोड पर्यंत पोहचू शकलं नाही .मग हर्षवर्धन नवाथे हॅाटसीट वर आला आणि पाहता पाहता सर्व प्रश्नांची उत्तर देतं एक करोड रुपये जिंकून त्याने इतिहास रचला. 

हर्षवर्धन जेव्हा किबीसी मध्ये आला तेव्हा तो सिव्हिल ची तयारी करत होता .केबीसी मध्ये रक्कम जिंकून हर्षवर्धन पॉप्युलर तर झाला मात्र तो सिव्हिल ची पुढील तयारी पूर्ण करू शकला नाही 
यांनतर एमबीएच्या पुढील शिक्षणासाठी तो परदेशात गेला.सध्या हर्षवर्धन natwest कंपनीमध्ये चांगल्या पदावर रुजू आहे 

पत्नी करते हे काम 

हर्षवर्धन ची पत्नी सारिका नवाथे मराठी फिल्म जगतात नावाजलेली आहे सारिका मराठीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सारिकाने काम केलं आहे नुकत्याच चालू असणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतसुद्धा सारिका काम करते.हर्षवर्धनला एक मुलगा देखील आहे जो फुटबॉल मध्ये खूप चांगला खेळाडू आहे  

याच प्रश्नच उत्तर देऊन हर्षवर्धनने जिंकले होते १ करोड रुपये 

प्रश्न : खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेनुसार संसदेच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी आहे? बरोबर उत्तर आहे- अॅटर्नी जनरल.