एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: Jul 9, 2023, 07:19 PM IST
एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?  title=
jJuly 9, 2023 | Katrina Kaif and Vicky Kaushal shares and romanctic photo on instagram

Katrina Kaif and Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या लाडक्या पतीसह सध्या एन्जॉय करताना दिसते आहे त्यामुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. कतरिना ही प्रत्येकाचीच क्रशच आहे. विकी कौशलसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या चाहत्यांची नाराजी साफ दिसत होती. कोणालाही काहीच थांगपत्ता लागू न देता त्यांनी 9 डिसेंबर 2021 ला आपला लग्नसोहळा संपन्न केला. त्यामुळे चाहत्यांना पुरता आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा जोरात सुरू होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे विकेट यांनी लग्न केल्यानंतरही त्यांना चाहत्यांवर टाकलेली गुगली पाहते चाहते पुरते संभ्रमात गेले होते. अनेकांना कतरिना आणि विकी कौशलला ट्रोलही करत होते. 

पण यावर्षी त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पुर्ण होत आहेत. सध्या त्यांचा संसार अगदी सुखी सुरू आहे. अनेकदा ते आपले एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची प्रचंड चर्चा रंगलेली असते. दोन दिवसांपुर्वी कतरिनानं एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात कतरिना आणि विकी आपली सकाळ मस्तपैंकी एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळी कतरिनानं टाकलेल्या पोस्टवरती चाहत्यांच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. तिनं आपल्या आणि विकीचा अगदी कोझी फोटो यावेळी शेअर केला आहे सोबतच ब्रेकफास्टला पॅनकेक्स आणि कॉफीचा दोघांनीही आनंद लुटला आहे. त्यामुळे त्यांच्या या गोड फोटोवर चाहत्यांनी तूफान लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. 

हेही वाचा - ''...तोपर्यंत मराठी चित्रपट चालणार नाहीत'', लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जुना Video व्हायरल

कॉफी मॉर्निंग्स…द बेस्ट! असं कॅप्शन तिनं आपल्या फोटोतून दिलं आहे. तिनं विकीसोबत आपला आणि कॉफी व पॅनकेकचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या या पोस्टमुळे ते दोघंही चर्चेत आले आहे. ते दोघं हे अनेकदा एकत्र सण सभारंभ साजरे करतात. सोबतच अनेकदा एकत्रही असतात. त्यामुळे त्यांचे हे लव्हीडव्ही फोटो पाहून चाहते त्यांच्या फोटोंवर तूफान कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी त्यांच्या या कपलगोल्सवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''हे दोघं किती आनंदी आहेत...'' अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, ''क्यूट कपल''. गेल्या काही दिवसांपासून कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. आताही तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चा रंगताना दिसतात.