कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा किसिंग सीन व्हायरल

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या आगामी 'लव आज कल 2'चे चित्रीकरण सुरू आहे. 

Updated: Mar 7, 2019, 05:04 PM IST
 कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा किसिंग सीन व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये धमाकेदार डेब्यू करणारी अभिनेत्री सारा अली खानने करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. साराच्या या विधानानंतर या दोघांबाबत चर्चा सुरू झाली होती. आता दोघांनी शूटींगदरम्यान केलेला किसिंग सीन चांगलाच व्हायरल होत आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन आगामी 'लव आज कल 2'चे चित्रीकरण करत आहेत. 

सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार आहे. इम्तियाज अलीच्या या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना कास्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं आहे. या चित्रपटातील सारा-कार्तिकचा रोमॅन्टिक सीन त्यांच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला. त्यातील दोघांचा किसिंग सीन व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सिंबा चित्रपटाच्या प्रमोशन पार्टीवेळी रणवीर सिंहने सारा आणि कार्तिकची भेट करून दिली होती. त्यांची भेट करून देताना रणवीरने या दोघांचा हातही एकमेकांच्या हातात दिला होता. त्यावेळीही कार्तिक, साराचा हा फोटो व्हायरल झाला होता.