मुंबई : गरोदरपणाच्या काळातही आणि त्यानंतरही करिना कपूरने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यामध्ये नेहमीच समतोल साधला. तैमूरच्या जन्मानंतर काही महिन्यातच करिना कामावर पुन्हा रूजू झाली.
एका खास प्रोजेक्टसाठी करिना आणि करिष्मा कपूर फोटो शूट करत आहे. या फोटोशूट दरम्यान पहिल्यांदाच तैमूर ऑन सेट पोहचला होता. त्याचे खास क्षण करिष्मा कपूरने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर तैमूरचे फोटो शेअर करताना करिष्मा कपूरने लिहले होते की, ' आज आमच्या सेटवर एक खास पाहुणा आला आहे'
तैमूर सोबतच करिष्मा कपूरची मूलंदेखील ऑन सेट पहायला मिळाली. सोमवारी एका फोटोशूट दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये तैमूरला पाहून करिना समवेत इतरांच्याही चेहर्यावरही हास्य उमटले.
तैमूर सोबतच करिष्माचा मुलगा कियान आणि मुलगी समायराही सेटवर पोहचली होती. यावेळेस कपूर फॅमिलीतील या भावंडांचा फोटो करिष्माने मोबाईलमध्ये कैद करून इंस्टाग्रामवर टाकला.
करिना आणि करिष्मा कपूर यांच्या मुलांसोबत बबीतादेखील मेहबूब स्टुडिओमध्ये आल्या होत्या. स्टुडिओच्या बाहेर सार्यांनी फोटोग्राफर्ससाठी खास पोज दिल्या.
एका ब्रॅन्ड शूटसाठी करिना आणि करिष्मा एकत्र आल्या होत्या. करिना बेबी पिंक ड्रेसमध्ये तर करिष्माने लाईट ब्लू ड्रेस घातला होता.