वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा...

काजोलची वागणूक पाहून अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.   

Updated: Aug 6, 2021, 05:57 PM IST
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा... title=
स्क्रीनग्रॅब

मुंबई : रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या प्रेक्षकांना अनेकदा कलाकार म्हणजे त्यांच्याच हक्काच्या व्यक्ती वाटू लागतात. खरंतर प्रेक्षक आणि कलाकारांमधील हे नातं हेवा वाटण्याजोगं आहे. पण, या नात्यामध्ये समतोल राखला जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

चाहत्यांच्या अमाप प्रेमापोटीच एखाद्या कलाकाराला यशशिखरावर पोहोचणं आणि प्रसिद्धीझोतात राहणं शक्य होतं. पण, काही प्रसंगी मात्र कलाकारांची वेगळीच आणि अनपेक्षित रुपं चाहत्यांसमोर येतात आणि त्यांचा हिरमोड होतो. सध्या अभिनेत्री काजोल (काजोल) हिच्यावर अशाच कारणामुळे चाहत्यांचा रोष ओढावला आहे. 

दिशा पटानीचा 'Pink Bikini' लूक पाहून 'टायगर' घायाळ, म्हणाला.... 

 

काजोलचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्यावेळी या खास दिवसाचं औचित्य साधत काही चाहते केक घेऊन काजोलच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी काजोल मास्क लावून बाहेर आली, तिनं दुरूनच केकही कापला. पण, चाहत्यांशी संवादही न साधता केक कापून ती थेट निघून गेली. कोरोनाचं संकट पाहता तिनं सावधगिरी बाळगली होती खरी. पण, त्यामध्ये असणारा संकोलचेपणा अनेकांनाच खटकला. 

काजोलनं चाहत्यांना दिलेली ही वागणूक पाहून नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिच्यावर टीकेची झोड उठवली. ती अजिबातच आनंदी नाहीये, किती गर्विष्ठ आहे ही...., लोकं त्यांची वेळ वाया का घालवतात अशा कमेंट करत काजोलला नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेतलं. चाहत्यांकडून मिळणारं प्रेम कलाकारासाठी सर्वस्वी महत्त्वाचं असतं. पण, कलाकारांनीही या प्रेमाचा आदर करणं अपेक्षित असतं अशा शब्दात काही नेटकरी व्यक्त झाले आहेत.