मुंबई : 21 फेब्रुवारीला करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. करीनाने एका मुलाला जन्म दिला आणि याचबरोबर तैमूर अली खान मोठा भाऊ झाला. २०१६ मध्ये त्याचा जन्म झाल्यापासून तैमूर बराच वादात होता. त्याला कारणही तसचं आहे. करीना आणि सैफने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं आणि तैमूरच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, सैफिनाच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. सैफ अली खाननेसुद्धा हे नाव बदलण्यास सहमती दर्शविली पण करीनाने तसं करण्यास साफ नकार दिला.
पतौडी कुटुंबात आता एक नवीन पाहुणा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सैफिनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. तर त्यांचे चाहते सोशल मीडियावर सैफिनाला मुलाचं नाव सुचवत आहेत. त्याचबरोबर काही लोकांचा असा विश्वास आहे की, तिच्या दुसर्या मुलाचे नाव फैज ठेवू शकतात. कारण सैफिनाने तैमूरच्या जन्माच्या वेळी चाहत्यांनी सजेस्ट केलेल्या नावावरुन 'तैमूर' असं नाव ठेवलं होतं.
करिना कपूर एकदा कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाली की, "तैमूरच्या जन्माच्यावेळी रूग्णालयात जाण्यापूर्वी एक दिवस आधी सैफने मला सांगितले की, जर मुलगा झाला तर तुला खात्री आहे की, त्याचं नाव तैमूर असेलच?" आपण हे नाव बदलूया. त्याचं नाव फैज असं ठेवूयात. हे नाव थोडे अधिक काव्यात्मक आणि रोमँटिकदेखील आहे. यावर मी नकार दिला, आपण नाव न बदलता तैमूरचं ठेवू. माझा मुलगा लढाऊ व्हावा अशी माझी इच्छा आहे. तैमूर म्हणजे आयर्न आणि मला आयर्नमॅनसारखं घडवायचं आहे.
तैमूर अली खान जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये राहत असून तो मीडियाचा आवडता चेहरा बनला आहे. आता तैमूरच्या धाकट्या भावाचे नाव काय असेल, ते फक्त वेळच सांगेल, पण हे निश्चित आहे की या वेळी नाव ठेवताना सैफिना खूप काळजी घेईल ऐवढं मात्र नक्की.