...आणि सनीने केले पहिले बोल्ड फोटोशूट!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकची वेब सिरीज zee 5 वर प्रसारित करण्यात आली आहे.

Updated: Jul 19, 2018, 09:16 AM IST
...आणि सनीने केले पहिले बोल्ड फोटोशूट! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकची वेब सिरीज zee 5 वर प्रसारित करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये सनी लिओनीच्या प्रोफेशनल ते पर्सनल लाईफच्या सर्वच गोष्टींचा उलघडा होणार आहे. सनीचा आयुष्यातील प्रवास खडतर, अनोखा आणि हटके होता. तिचा हाच जीवनप्रवास  'करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी' या वेबसिरीजमधून पाहायला मिळणार आहे. स्वतःच आपल्या बायोपिकमध्ये काम करणारी सनीही पहिलीच कलाकार आहे.

संघर्षमय आयुष्य

प्रसारीत झालेल्या एपिसोडसमधून सनीचे खडतर आयुष्य समोर येत आहे. पार्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा सनीचा प्रवास सोपा नव्हता. अनेक संघर्षांचा सामना करत ती इथपर्यंत पोहचली आहे. सुरुवातीच्या काळात तिच्या कुटुंबाला आर्थिक चणचणही भासली होती. 

आणि तिने केले बोल्ड फोटोशूट

एक सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर सनीला अनेक बोल्ड फोटोशूटच्या ऑफर्स येऊ लागल्या. दरम्यान तिच्या वडीलांची नोकरी गेली आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डगमगली. तेव्हा बोल्ड फोटोशूटबद्दल द्विधआ मनःस्थितीत ती अडकली. आणि तेव्हाच तिच्या आईला मंगळसूत्र गहाण ठेवताना सनीने पाहिले. घरची ही बिकट परिस्थिती पाहता तिने फोटोशूटचा प्रस्ताव स्विकारला आणि मिळालेल्या पैशातून तिने आईचे मंगळसूत्र सोडवले.
परिस्थितीपुढे हतबल झाल्यानंतर तिने असे अनेक फोटोशूट केले आणि त्यातूनच तिला नवी ओळख मिळाली. पण सनी नेमकं काय काम करते, याची कल्पना तिच्या घरच्यांना नव्हती. आणि खुद्द सनीनेही त्याबद्दल गुप्तता बाळगणे पसंत केले.