ओढणी पायाखाली आली, तरी बेबोची चाल बदलेना; तिच्याजागी तुम्ही असता तर...

करीनाच्या हटके व्हिडीओची सर्वत्र चर्चा, बेबोच्या ओढणीने वेधलं अनेकांचं लक्ष....   

Updated: Aug 9, 2022, 10:12 AM IST
ओढणी पायाखाली आली, तरी बेबोची चाल बदलेना; तिच्याजागी तुम्ही असता तर...  title=

मुंबई : आताच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये अनेक हॉट आणि ग्लॅमरस चेहऱ्यांचं पदार्पण झालं आहे. असं असताना देखील अभिनेत्री करीना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) अदांची जादू चाहत्यांच्या मनात कायम आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. करियर सांभाळत कुटुंबाला वेळ देणारी करीना सध्या एका व्हिडीओमुळे तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत करीनाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता ट्रेंड होत (bollywood stylefile) असलेल्या व्हिडीओमध्ये करीना तिच्या ड्रेस, ओढणी आणी चालीमुळे चर्चेत आली आहे. 

नुकताच बेबोला वांद्रे येथील मेहबूब स्टुडीओ बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी करीना निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. करीना गाडीतून जशी बाहेर निघाली तशी पापाराझींची नजर तिच्या पडली आणि बेबो कॅमेऱ्यात कैद झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पापाराझींना पोज देत असताना करीनाची ओढणी नकळत तिच्या पायाखाली आली.  त्यानंतर बेबोने ओढणी सांभाळत पापाराझींना हटके पोज दिल्या. करीनाच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

करीनाचा आगामी सिनेमा
अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha )या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आमिर आणि करीना कपूर खानसोबत या चित्रपटात नागा चैतन्य (Naga Chaitanya) देखील दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाची क्रेझ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही निर्माण झाली असून आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.