मीडियासमोर रुबाबत, पण घरी मात्र... तैमूरच्या समोर आलेल्या फोटोमुळे सगळेच चकीत

या खास दिवशी करिनाने तिच्या लहान मुलाला एक गोंडस फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Feb 21, 2022, 03:05 PM IST
 मीडियासमोर रुबाबत, पण घरी मात्र... तैमूरच्या समोर आलेल्या फोटोमुळे सगळेच चकीत title=

मुंबई : छोट्या जेह अली खान याचा आज वाढदिवसाच्या आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा छोटा नवाब जेह अली खान आज एक वर्षाचा झाला आहे.

जेहचा पहिला वाढदिवस आहे. छोटे नवाबच्या वाढदिवसानिमित्त सैफ आणि करिनाच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. या खास दिवशी करिनाने तिच्या लहान मुलाला एक गोंडस फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर खानने जहांगीरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिच्या दोन मुलांचा एक खास फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटोमध्ये तैमूर आणि जेह खेळताना दिसत आहेत. 

तैमूर आणि जेह यावेळी घोडा-घोडा हा लहान मुलांचा खेळ खेळत आहे. तैमूर लहान भावाला खेळवताना दिसत आहे. हा फोटो सगळ्यांनाच फार आवडला आहे. तैमूर पुढे तर छोटा जेह त्याच्या भावाच्या मागे जाताना दिसत आहे.

दोन्ही भावांना एकाच फ्रेममध्ये असे खेळताना पाहून चाहते आनंदित झाले आहेत. तैमूर आणि जेहच्या क्युट फोटोसोबत करिनाने खूप क्यूट कॅप्शनही लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीनाने जेहच्या वतीने तैमूरसाठी मेसेज लिहिला - भाऊ, माझी वाट बघ.. आज मी एक वर्षाचा झालो आहे. एकत्र जग एक्सप्लोर करा. आईदेखील सर्वत्र तुमच्या मागे असणार आहे.