आलिया भट्ट नाही तर 'ही' अभिनेत्री दिसली कपूर परिवारासोबत, फोटो व्हायरल

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब आहे.

Updated: Feb 23, 2022, 09:06 PM IST
आलिया भट्ट नाही तर 'ही' अभिनेत्री दिसली कपूर परिवारासोबत, फोटो व्हायरल title=

मुंबई : कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब आहे. या घराण्याने मनोरंजन विश्वाला अनेक स्टार्स दिले. नुकताच या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो करिना कपूरने शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचं कुटुंब दिसत आहे. याचबरोबर  एक बॉलिवूड अभिनेत्री देखील दिसत आहे. जिचं वर्णनही करिनाने तिचं कुटुंब असं केलं आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कपूर खानदान
बॉलिवूडचं कपूर कुटूंब हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. हे कुटुंब इतकं मोठं आहे की, इथं अगदी लहानातले लहान कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरे केले जाताात. त्यामुळे कपूर परिवारेचे फोटो पहायला चाहत्यांना देखील फार आवडतात. आता नुकतंच कपूर कुटुंबाची गेट टुगेदर पार्टी पार पडली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तारा सुतारिया देखील दिसली
हे फोटो आणि व्हिडिओ करिना कपूर, नीतू कपूर आणि करिश्मा कपूरने शेअर केले आहेत. बॉलीवूडचं कपूर खानदान जेवढं मोठं आहे तेवढच ते पॉप्यूलरदेखील आहे. या फोटोत करिना कपूर खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, रीमा जैन, निताशा नंदा, आदर जैन, अरमान जैन, अनीसा मल्होत्रा जैन आणि तारा सुतारिया दिसत आहेत. 

या फोटोत संपूर्ण परिवार हॅप्पी दिसत आहे. कपूरच्या फॅमिली पिक्चरमध्ये लव्हबर्ड्स आधार जैन आणि तारा सुतारिया देखील दिसत आहेत. गेट टुगेदरचे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत करिनाने लिहिलं आहे की, 'मा फॅमिलीया.' तर कॅप्शन देताना रिद्धिमाने लिहिलं आहे की, 'सिस्टर बॅंटर.'