Sangeeta Bijlani | लग्न पत्रिका छापूनही सलमान खानपासून अखेर का दूरावली अभिनेत्री?

सलमान खान आणि संगिता बिजलानीच्या लग्न पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. मात्र अचानक हे लग्न तुटलं

Updated: Feb 23, 2022, 08:32 PM IST
Sangeeta Bijlani | लग्न पत्रिका छापूनही सलमान खानपासून अखेर का दूरावली अभिनेत्री? title=

मुंबई : सिनेमाची दूनिया जशी पडद्यावर मांडली जाते. तशी ती खऱ्या आयुष्यात नसते.  या ग्लॅमरस दुनियेत जेवढ्या सहज लव्हस्टोरीज पहायला मिळतात. तेवढ्याच सहज ईथे ब्रेकअपच्या बातम्या ऐकायला मिळतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लग्न करताना साता जन्माचं वचन घेतलं जातं खरं. मात्र हे नात कधी तुटेल याची कुणालाच खात्री नसते. बॉलिवूडमध्ये लग्न मोडल्याच्या किंवा ब्रेकअपच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी असाच काहिसा प्रकार घडला होता. ज्याची आजवर चर्चा आहे.

असं म्हटलं जात की, सलमान खानसोबत संगिता बिजलानीची जवळिकता एवढी वाढली होती की, हे दोघंही लग्न करणार होते. दोघांच्या लग्न पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. मात्र अचानक हे लग्न तुटलं. आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यानंतर संगिता बिजलानीचं नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत जोडलं गेलं. दोघांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केलं. आणि नंतर लग्न केलं. मात्र अजहरसोबतही संगिताचं लग्न फार काळ टिकलं नाही.

आधी सलमान खानसोबत तुटलं नातं
आत्तापासून जवळ-जवळ 28 वर्षांआधी सलमान खान आणि संगिता बिजलानी यांचं अफेअर आणि अचानक तुटलेलं लग्न चर्चेत होतं. ही चर्चा आजपर्यंत संपली नाही. लोकांच्या मनात आजपर्यंत हा प्रश्न आहे की, अखेर या दोघांमध्ये एवढं प्रेम होतं की, हे दोघं लग्न करणार होते आणि मग अचानक या दोघांमध्ये असं काही घडलं ज्यामुळे त्यांचं लग्न तुटलं? या बातमीने सलमानच्या जवळच्या व्यक्तींसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.

27 मे 1994 या तारखेला सलमान आणि संगिता बिजलानीचं लग्न पार पडणार होतं. मात्र हे लग्न सलमानकडून नाही तर संगिताच्या बाजून तुटलं होतं. एका मुलाखतीमध्ये संगिता म्हणाली होती की, '' लग्न ठरल्यानंतर सलमान खानची अभिनेत्री सोमी अलीसोबत  जवळीक वाढली होती. आणि आमच्या दुराव्याचं हेच कारण''.