लग्न सोनमचं पण चर्चा होतेय तैमूरची.... पाहा फोटो

आज सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र या लग्नात सोनम - आनंद पेक्षा एका व्यक्तीची भरपूर चर्चा झाली. आणि हा स्टार किड कायम या ना त्या कारणाने लाइमलाइटमध्ये असल्याच आपण पाहिलं आहे आणि दुसरं तिसरं कुणीही नसून ही व्यक्ती आहे लिटिल प्रिंस तैमूर.... 

लग्न सोनमचं पण चर्चा होतेय तैमूरची.... पाहा फोटो  title=

मुंबई : आज सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र या लग्नात सोनम - आनंद पेक्षा एका व्यक्तीची भरपूर चर्चा झाली. आणि हा स्टार किड कायम या ना त्या कारणाने लाइमलाइटमध्ये असल्याच आपण पाहिलं आहे आणि दुसरं तिसरं कुणीही नसून ही व्यक्ती आहे लिटिल प्रिंस तैमूर.... 

तैमूरचा डॅडी सैफ अली खान आणि मम्मी करीना कपूर आणि स्वतः तैमूर या लग्नात पिंक कलरच्या कपड्यांमध्ये लग्नात सहभागी झाले होते. या तिघांचाही रॉयल अंदाज अगदी पाहण्यासारखा होता. सैफ आणि तैमूर पिंक रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये तर करीना कपूर पिंक रंगाच्या अनारकलीमध्ये दिसली. तिघांचा परफेक्ट फॅमिली फोटो सध्या व्हायरल होत आहे. आणि या फोटोतील तैमूरची अधिक चर्चा होत आहे. 

Sonam Kapoor Wedding

तैमूरचा हा फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे. असं वाटतं की या दोघांच्या लग्नात तैमूरच चीफ गेस्ट आहे. सोनम कपूर आणि करीना कपूर पहिल्यांदाच ''वीरे दी वेडिंग'' या सिनेमांत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

Taimur at sonam wedding

सोनम कपूर लाल रंगाच्या या लग्नाच्या जोड्यात अधिक सुंदर दिसत आहे. तिने अनुराधा वाकिल यांनी डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. सोनम आणि आनंदच लग्न अगदी पंजाबीतील पारंपरिक पद्धतीने झालं. यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर, राणी मुखर्जी, जॅकलीन फर्नांडिस, स्वरा भास्कर, करिश्मा कपूर सहित अनेक स्टार्स उपस्थित होते.