माधवी निमकरला या बॉलीवूड अभिनेत्यासोबत जायचयं डेटला

झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईफप्रमाणेच ग्लॅमरस आहे. 

Updated: May 8, 2018, 03:53 PM IST
माधवी निमकरला या बॉलीवूड अभिनेत्यासोबत जायचयं डेटला title=

मुंबई : झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईफप्रमाणेच ग्लॅमरस आहे. या मालिकेत तिची भूमिका स्टायलिश अशी दाखवण्यात आलीये. खऱ्या आयुष्यातही ती काहीशी तशीच आहे. मालिका मसालाच्या निमित्ताने माधवी निमकरला काही झटपट प्रश्न विचारण्यात आले. तिचा आवडता अभिनेता कोण, आवडता सिनेमा, अभिनेत्री, कोणसोबत डेटवर जायला आवडेल असे काहीसे प्रश्न विचारण्यात आले. कोणासोबत डेटवर जायला आवडेल असे तिला विचारले असता तिने क्षणाचाही विलंब न करता सलमान खान असे उत्तर दिले. तिला सलमानसोबक एकदातरी डेटवर जायला आवडेल.