Kareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान... शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा

Kareena Kapoor Khan Salman Khan : सलमान खाननं एका शोमध्ये हा खुलासा केला. त्यावेळी करीना आणि करिश्मा या दोघीही शोमध्ये आल्या होत्या. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सलमान आणि करीना या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 2, 2023, 03:31 PM IST
Kareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान... शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Kareena Kapoor Khan : अभिनेत्री करीनाच्या बाथरूममध्ये सलमान खानचा फोटो ? ऐकून विश्वास बसला नाही ना. परंतु या गोष्टीचा खुलासा चक्क सलमानने  'दस का दम' या टीवी शोमध्ये केला होता. 'मैंने प्यार किया' या सलमानचा सुपरहिट चित्रपटाच्या रिलीज नंतर सलमान खान रातोरात स्टार बनला. सलमान तरुण तरुणींचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. मुलींमध्ये तर सलमान या नावाची जबरदस्त क्रेज होती. या काळात शाळेत जाणारी करीना कपूरही त्याच्या प्रेमात पडली. तिने तर आपल्या बाथरूममध्ये सलमान खानचे पोस्टरही लावले होते. पण काही काळानंतर असे काही घडले की तिने सलमानने ते पोस्टर्स फाडून टाकले आणि राहुल रॉयचे पोस्टर्स लावले. याचा खुलासा सलमानने त्याच्या 'दस का दम' शोमध्ये केला होता. जेव्हा सलमानने हे सांगितले तेव्हा हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे हसू लागले होते.

करीनाच्या बाथरूममध्ये सलमान खानचे पोस्टर अभिनेत्यानं केला खुलासा

सलमान म्हणाला, 'मी आणि करिश्मा त्यावेळी 'निश्चय' या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. या दरम्यान, करिश्माने मला सांगितले की, बेबोने म्हणजेच करीनाने माझे पोस्टर तिच्या बाथरूममध्ये लावले आहे. मात्र, यानंतर राहुल रॉय चा 'आशिकी' रिलीज झाला आणि बेबोने माझे पोस्टर फाडून त्या ठिकाणी राहुल रॉयचे पोस्टर लावले. शिवाय करीना स्वतःही आली आणि मला म्हणाली की सलमान आता तुझे पोस्टर माझ्या बाथरूममध्ये नाही. आता राहुल रॉयचे पोस्टर माझ्या बाथरुमध्ये आहे.

हेही वाचा : Rana Daggubati च्या घरी होणार छोट्या पाहुण्याचे आगमन? अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने चाहते आश्चर्यचकित

काही वर्षांपूर्वी 'दस का दम'मध्ये करीना आणि करिश्मा या दोघींनी हजेरी लावली होती. सलमाननं या वेळी सांगितलेला हा किस्सा ऐकूण करीना हसू लागली. पुढे जेव्हा करीनाने मोठी झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली, तेव्हा तिने सलमानसोबत अनेक चित्रपट केले. यामध्ये 'बॉडीगार्ड', 'बजरंगी भाईजान' आणि 'मैं और मिसेस खन्ना' या चित्रपटांचा समावेश आहे. सलमान आता त्याचा आगमी 'टायगर 3' आणि 'टायगर Vs पठाण' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर करीना 'क्रू' चित्रपटात तब्बू आणि क्रिती सेननसोबत दिसणार आहे.

सलमान खाननं आपल्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि तिची मोठी बहीण करिश्मा कपूर या दोघींसोबत काम केले. करिश्मासोबत सलमान 'जुडवा', 'अंदाज अपना अपना' आणि 'जीत' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. त्यावेळी करीना शाळेत शिकत होती.