Kareena Kapoor welcome new baby : दुसऱ्यांदा आई झाली करीना; तैमूर झाला Big Bro

सैफच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन  

Updated: Feb 21, 2021, 12:11 PM IST
Kareena Kapoor welcome new baby : दुसऱ्यांदा आई झाली करीना; तैमूर झाला Big Bro  title=

मुंबई : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. करीनाने दुसऱ्यांदा एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तैमूर अली खान मोठा भाऊ झाला आहे. या गोड बातमीने सगळ्यांनाच आनंद झाला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. करीना आणि सैफला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

१५ फेब्रुवारी दिली होती डिलिव्हरी डेट करीना कपूरला १५ फेब्रुवारी रोजी डिलिव्हरी डेट दिली होती. 15 फेब्रुवारी रोजी करीनाची डिलिव्हरी झाली नाही. ही हिंट रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा सांगितलं होतं. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास ब्रीजकँडी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आलं.

२०१६ मध्ये करीना आणि सैफ अली खान यांचा तैमूर अली खान या मोठ्या मुलाचा जन्म झाला आहे. २०२१ मध्ये करीना आणि सैफच्या दुसऱ्या बाळाचं आगमन झालं आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ आणि करीनाने लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये करीना कपूर पहिल्यांदा आई झाली. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं मोठा वाद देखील निर्माण झाला होता. मात्र यानंतर तैमूर अली खान या सोशल मीडियावरील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारा स्टार किड ठरला. यानंतर आता करीनाच्या दुसऱ्या बाळाची चर्चा आहे.